अमरावती - मोर्शी तालुक्यात माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली येथील एका प्रेमीयुगुलाने सालबर्डी ( Couple Attempted Suicide at salbardi ) येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेतीला युवकाचा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात ( Salbardi Couple Suicide Case Youth Died ) उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
सालबर्डीला जाऊन प्राशन केले विष -
वाघोली येथील सुरज श्रावण वानखडे (25) या युवकाचे गावातीलच एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले. आज हे प्रेमीयुगल श्री क्षेत्र सालबर्डी येथे आले व त्यांनी लहान महादेवाच्या भुयार मार्गावर असलेल्या हत्ती डोहाच्या पहाड परिसरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना मिळताच त्यांनी दोघांना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाला उपचारासाठी दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांच्या शरीरातील विषारी औषध काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांची तब्येत चिंताजनक असल्याचे पाहून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालपयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सुरज श्रावण वानखडे याचे निधन झाले. तर अल्पवयीन युवतीवर अद्यापही उपचार सुरु आहेत.
मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांकडू संयुक्त तपास -
ही घटना ज्या ठिकाणी घडली, ते ठिकाण हे मध्यप्रदेशच्या हद्दीत येत असून युवक व युवती दोघेही महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या घटनेचा तपास मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र पोलीस सयुक्तरित्या करत आहेत.