अमरावती - मध्यप्रदेशातून आणलेले बनावट खत नामांकित कंपनीच्या सुपर फॉस्फेट बॅगेमध्ये भरून विकण्याच्या अवैध धंद्याचा अमरावतीच्या आसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे चार लाख 75 हजार रुपयांचे बनावट खत व साहित्य जप्त केली आहे. तसेच तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा... सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तेलंगणा एन्काऊंटरविरोधातील याचिका
किरकोळ तीनशे रुपयांचे असलेले सुपर फॉस्फेट खत महागड्या 10-26-26 नावाने विकणारे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय निर्माण झाला होता. त्याचा कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. यात कृषिकेंद्रीत सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमरावतीच्या आसेगाव येथील इंदिरा पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या एका ट्रकची पोलिसांनी झडती घेतली असता ट्रकमध्ये नामांकित कंपनीचे खत बाळगणाऱ्या ट्रकचालकाला खताची पावती मागितली असता त्याच्याकडे कोणती कागदपत्रे मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला दरम्यान पोलिसांनी याची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाला पत्र दिले. कृषी विभागाच्या गुणवत्ता निरीक्षण अनंत मसकरे यांना बोलावून ही कारवाई करण्यात आली. अंतिम तपासात ही खते बनावट असल्याचे आढळून आले.
हेही वाचा... 'सत्तेत असताना 'सामना' वाचला असता, तर सत्ताही वाचली असती'