ETV Bharat / city

कल्पना चावला संशोधक पुरस्कारासाठी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे आवाहन - कल्पना चावला संशोधक पुरस्कार बातमी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून कल्पना चावला यंग लेडी रिसचर्र अॅवॉर्ड -2020 हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून या पुरस्कारासाठी तरुण संशोधकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

official photo
official photo
author img

By

Published : Nov 18, 2020, 7:45 PM IST

मुंबई - विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या तरुण संशोधकांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून कल्पना चावला यंग लेडी रिसचर्र अॅवार्ड-2020 हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून या पुरस्कारासाठी तरुण संशोधकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कल्पना चावला यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात भरीव योगदान आणि संशोधन केलेल्या तरुणांना दिला जाणार आहे. यासाठी वयोमर्यादा ही किमान 35 वर्षे आणि त्यापुढे असणे आवश्यक असून यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या https://www.sgbau.ac.in/pdf/573Adv--2.pdf या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली नियम आणि पात्रता यासाठीची माहिती देण्यात आली आहे.

या आहेत अटी
या पुरस्कारासाठी ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे, त्यासाठी त्याचे संशोधन हे उच्च दर्जाचे अणि तज्ज्ञांकडून त्याला मान्यता मिळालेले असावे. तसेच विदर्भ परिसरात पीएचडी केलेल्या उमेदवारांना यासाठी प्राथमिकता दिली जाणार आहे. पीएचडीचा हा विषय प्रसिद्ध अशा जर्नलमधून प्रकाशित झालेला असावा. तसेच त्यांनी स्वतंत्र संशोधन कार्य केलेले असावे. तसेच यासाठी हे संशोधन यूजीसी, सीएसआयआर आदी स‍ंस्थांनी मान्यता दिलेला असावा, अशी अटही यात टाकण्यात आली आहे. संशोधकाने ज्या विषयांवर संशोधन केलेले आहे. त्याचे संशोधन हे विविध प्रकारच्या संशोधन पत्रिका आणि नियतकालिकांमधून ते प्रसिद्ध झालेले असावे.

१०० रुपये शुल्क

कल्पना चावला यांच्या नावाच्या या पुरस्कारासाठी संशोधकांनी विद्यापीठाच्या संकेस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करावा. यासाठी प्रत्येक अर्जासाठी शंभर रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.