अमरावती - अमरावती शहरातील वलगाव पोलीस ठाण्यात ( Walgaon Police Station ) कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (API) विजय अडोकार यांनी आत्महत्या ( API Vijay Adokar Suicide ) केली आहे. आज सकाळी जिल्हा कारागृह परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान पोलीस आयुक्तांच्या जाचाला कंटाळून विजया डकार यांनी असे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
असा आहे कुटुंबीयांचा आरोप - शहरातील वडाळी परिसरातील रहिवासी असणारे विजय अडोकर यांना पॅरॅलिसिसचा आजार होता. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून ते रजेवर होते. अशातच कामावर रुजू होण्यासाठी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच बदलीसाठी वारंवार अर्ज करून देखील बदली केली नाही. त्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली असे विजय आडोकार यांची मुलगी अंकिता हिने सांगितले.
पोलीस दलात खळबळ - जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका कुटुंबाने घेतली आहे. दरम्यान पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या जाचाला कंटाळून विजय आडोकार यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केल्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Pune : पोटच्या मुलाला 2 वर्ष कोंडले श्वानाच्या रुममध्ये, मुलगा वागू लागला श्वानासारखे