ETV Bharat / city

Anil Bonde अमरावतीकरांनी मन की बात सामूहिकपणे ऐकावी व समजून घ्यावी- अनिल बोंडे - MP Anil Bonde

MP Navneet Rana चांगल्या कामासाठी हनुमान चालीसा Hanuman Chalisa पठण करणे हे चांगलेच आहे. आता तर माझे ज्येष्ठ विरोधक पण माझे अनुकरण करत आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे, असा टोला खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते, याप्रसंगी खासदार नवनीत राणा बोलत होते.

MP Navneet Rana
MP Navneet Rana
author img

By

Published : Sep 25, 2022, 5:57 PM IST

अमरावती : चांगल्या कामासाठी हनुमान चालीसा Hanuman Chalisa पठण करणे हे चांगलेच आहे. आता तर माझे ज्येष्ठ विरोधक पण माझे अनुकरण करत आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे, असा टोला खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते, याप्रसंगी खासदार नवनीत राणा बोलत होते. गेल्या काही वर्षापासून अमरावती जबलपूर एक्सप्रेस बंद आहे. ही रेल्वेगाडी सुरू व्हावी, यासाठी स्थानिक काँग्रेसने दोन दिवसांपूर्वीच येथील मॉडल रेल्वे स्टेशनवर हनुमान चालीसा पठणाचे आयोजन केले होते. त्याचा आधार घेत खासदार नवनीत राणांनी MP Navneet Rana काँग्रेसला टोला लगावला आहे.

त्यापुढे बोलताना म्हणाल्या की, अमरावतीमध्ये आता दोन खासदार आहेत. जिल्ह्यातील 25 लाख लोकांसाठी आवाज उठवण्याचे काम करतो. आता तर आमच्या विचारधारेचे सरकार राज्यात आल्याने प्रत्येक कामाला अधिक गती येईल. अमरावती महानगरपालिकेने Amravati Municipal Corporation विशेषत्वाने लक्ष घालून 'हॉकर्स झोन' दिवाळीपूर्वीच जाहीर करावीत. तसे झाल्यास फेरीवाल्यांची ओढतान थांबेल. त्यांनाही हक्काने आपला व्यवसाय करता येईल, याकडे खासदार नवनीत राणा यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

नवनीत राणा यांचा काँग्रेसला टोला

मन की बात सांस्कृतिक भवनात ३ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात च्या ९३ व्या कार्यक्रमाचे आयोजन आज सकाळी ११ वाजता सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते. यावेळी महानगरपालिकेतील कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, फेरीवाले तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मन की बात चे प्रक्षेपण अमरावतीकरांसाठी भूषणावह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये अमरावतीकरांना ही सहभागी करावे. हा माझा आग्रह होता. आपापल्या घरी बसून मन की बात नेहमीच ऐकतो. पण अमरावतीकरांनी सामूहिकपणे ऐकावे, समजून घ्यावे. यासाठीच पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार अनिल बोंडे MP Anil Bonde यांनी यावेळी दिली आहे. अमरावती स्वच्छ आणि सुंदर व्हावी, यासाठी मी निरंतर प्रयत्न करत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. अमरावती शहरांमध्ये एकूण ४ ते ५ हजार हॉकर्स असून यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३४३२ हॉकर्सला मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात जगात भारतासाज एक वेगळे स्थान निर्माण करून ओळख मिळवून दिली आहे. जागतिक पातळीवर भारताची एक स्वच्छ प्रतिमा तयार होऊ पाहते आहे, असे मत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, खासदार अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे- पाटील, विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर, चेतन गावंडे (माजी महापौर), तुषार भारतीय, किरण पातुरकर यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.