अमरावती - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा जाहीर केल्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीच्या बाहेर निघावे लागल्याची टीका किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सध्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची शासनाची पोलखोल झाली आहे. अनेक ठिकामी अद्याप पंचनामे झाले नाहीत. कांदा, ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, असे ही बोंडे म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी तर मंगळवार (दि. 20 ऑक्टोबर) तीन हजार आठशे रुपयांचा धनादेश देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्वी जी आश्वासने दिली होती, ती आश्वासन पूर्ण करावी. आता पंचनामे नको थेट मदत द्या,अशी ही मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
हेही वाचा - अमरावतीतील जंगलातून मोर बेपत्ता; वनविभाग मात्र झोपेतच