अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज चक्क डोसा विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या हातगाडीवर जाऊन स्वतः डोसा बनवला. त्यांनी यावेळी रस्त्यावर दुकान लावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांशी संवादही साधला.
हेही वाचा - दारुसाठी आईचा खून, मृतदेहाचे तुकडे करुन काढले काळीज, नराधम मुलाला फाशीची शिक्षा
- ...अन् खासदारांची गाडी अचानक थांबली
शेगाव नाका, कठोरा नाका परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकासाच्या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार नवनीत राणा निघाल्या होत्या. त्यावेळी गाडगेनगर परिसरात त्यांची गाडी अचानक थांबली. त्यानंतर खासदार राणा रस्त्याच्या कडेला डोसा विक्रेत्यांकडे गेल्या. त्यांनी डोस्याची चव चाखली आणि स्वतः डोसाही बनवला. लगतच्या चहा टपरीवरही त्या गेल्या आणि त्यांनी चहासुद्धा पिला. त्यावेळी त्यांनी विक्रेत्यांसोबत संवाद साधला.
- खासदार राणा यांनी कैऱ्या घेतल्या विकत -
चहा टपरीलगत कैरीची विक्री करणाऱ्यांकडेही खासदार नवनीत राणा पोचल्या. यावेळी त्यांनी दोन किलो कैऱ्याही विकत घेतल्या. कैरी विक्रेत्याने खासदार राणा यांच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला असता, खासदार नवनीत राणा यांनी मात्र त्याला पैसे घ्यायला लावले.
- छोट्या व्यावसायिकांनी मांडल्या अडचणी -
रस्त्यावर व्यवसाय करताना नेमक्या काय अडचणी येतात याची व्यथा छोट्या व्यावसायिकांनी खासदार नवनीत राणा यांच्या पुढे मांडल्या. छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी येत्या काही दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी खासदार नवनीत राणा यांनी दिले.
हेही वाचा - मोदी मंत्रिमंडळ २.० : नवीन केंद्रीय मंत्र्यांनी स्वीकारला पदभार