ETV Bharat / city

Amravati Curfew relaxation : अमरावती हळूहळू पुर्वपदावर; आजपासून मार्केट उघडण्यास परवानगी - अमरावती हिंसाचार

आजपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच बाजारपेठ खुली करण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे. तर सायंकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात संचारबंदी ही कायम असणार आहे.

Amravati Curfew relaxation
Amravati Curfew relaxation
author img

By

Published : Nov 20, 2021, 1:00 PM IST

अमरावती - एक आठवड्यापूर्वी अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर (Amravati Violence) शहरात संचारबंदी (Amravati Curfew) लावण्यात आली होती. हळूहळू ही संचारबंदी आता शिथिल होत आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आजपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच बाजारपेठ खुली करण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी (Amravati Curfew relaxation) दिली आहे. तर सायंकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात संचारबंदी ही कायम असणार आहे.

रिपोर्ट

अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर -

शहरात संचारबंदीमध्ये आता मोठी सूट दिली असती तरी पोलिसांचा खडा पहारा मात्र अद्यापही तैनात आहे. जो भाग संवेदनशील आहे, त्या भागामध्ये पोलिसांचा सर्वाधिक पहारा आहे. अमरावती झालेल्या हिंसाचारानंतर आता अमरावती शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिलासादायक चित्र ही पाहायला मिळत आहे. दरम्यान, इंटरनेट सेवा सुरू झाली असली तरी मात्र सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टवर सायबर पोलिसांची (Amravati Cyber Police) नजर असणार आहे. अमरावतीत बाजारपेठ सुरू (Market Reopen In Amravati) झाल्याने हळूहळू लोकांची गर्दी वाढली आहे.

संचारबंदीमुळे 700 ते 800 कोटींचा फटका -

आठवडा भर शहरातील दुकाने व सर्व बाजारपेठा बंद असल्याने याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना (Loss due to Curfew in Amravati) बसला आहे. यात 700 ते 800 कोटी व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती महानगर चेंबर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी दिली आहे. तर सरकारला कोट्यवधी रुपयांचा टॅक्स व्यापारी देतात. मात्र, बंद दरम्यान झालेलं नुकसान भरून न निघणार आहे.

प्रतिक्रिया

कोरोनातही बसला हजारो कोटींची फटका -

कोरोनाच्या स्थितीमध्ये अनलॉक सुरू असताना अमरावतीमध्ये दुसऱ्यांदा ही लॉकडाऊन लागले होते. यामध्येही हजारो कोटी रुपयांचा फटका बसल्याचे महानगर चेंबर असोशियन चे अध्यक्ष सुरेश जैन म्हणाले.

हेही वाचा - विदर्भातील हवामान राष्ट्रवादीला पोषक नाही, त्यामुळे शरद पवारांनी प्रकृतीची काळजी घ्यावी - अनिल बोंडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.