ETV Bharat / city

Amravati Violence : अमरावती शांतच राहू दे.. दोन्ही बाजूंच्या दोषींवर कारवाई करणार, यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना खडसावले - यशोमती ठाकूर

अमरावतील झालेल्या हिंसेनंतर दोन दिवस वातावरण कलुष्कीत झाले होते. आता अमरावती शांत झाली असून तिला शांतच राहू दे, अशा शब्दांत पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खडसावले. 12 आणि 13 तारखेला अमरावतीत घडलेली घटना (Amravati violence) निंदनीय आहे. ज्यांनी आंदोलन भडकवण्याचे काम केले, त्यांना सोडणार नाही.दोन्ही समाजातील नागरिकांवर गुन्हे दाखल होत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे आरोप बेजबाबदार असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

yashomati thakur
yashomati thakur
author img

By

Published : Nov 21, 2021, 3:34 PM IST

Updated : Nov 21, 2021, 5:11 PM IST

मुंबई - अमरावतील झालेल्या हिंसेनंतर दोन दिवस वातावरण कलुष्कीत झाले होते. आता अमरावती शांत झाली असून तिला शांतच राहू दे, अशा शब्दांत पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खडसावले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर असून हिंसेबाबत भडकावू विधान केले होते. पालकमंत्री ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला.

अमरावतीत 12 आणि 13 तारखेला घडलेली घटना (Amravati violence) निंदनीय आहे. ज्यांनी आंदोलन भडकवण्याचे काम केले, त्यांना सोडणार नाही. दोन्ही समाजातील नागरिकांवर गुन्हे दाखल होत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे आरोप बेजबाबदार असल्याचे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.

रजा अकादमीचा फायदा कोणाला होतो, ते देशाला माहीत आहे. हिंसाचाराबाबत (Amravati violence) गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत. कोणाच्याही आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. कोणीही राजकीय भाषा अमरावतीत करू नये. अमरावती आता शांत झालेली आहे. आम्हाला ती शांत ठेवायची आहे, असे महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)म्हणाल्या.

घटना निंदनीय -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमरावतीची घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच रजा अकादमी संघटनेवर कारवाईची मागणी केली. पालकमंंत्री ठाकूर यांनी या सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. देवेंद्र फडणवीस जबाबदार विरोधीपक्ष नेते आहेत. त्यांनी अमरावती घटनेवर बेजबाबदारपणाचे वक्तव्य करु नये. १२ नोव्हेंबरची घटना निंदनीय असून १३ नोव्हेंबरची घटना अत्यंत निंदनीय होती. दोन्ही घटनांमधील लोकांवर कारवाई सुरु आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. मात्र, बाहेरुन येऊन कोणीही अमरावती भडकवण्याचे काम करु नये. अमरावती शांत आहे, तिला शांतच राहू दे, असेही त्या म्हणाल्या.

दोषींवर कारवाई निश्चित -

ज्या लोकांनी १२ आणि १३ नोव्हेंबरला हिंसा निर्माण केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दंगल झालेली संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. जनतेने वेळीच आधार दिल्याने, शांतता राखता आली. दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गृहमंत्रीही स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. रझा अकादमीचा फायदा कोणाला होत असतो ते सर्वांना माहिती आहे. ज्या ज्या गोष्टी हिंसा निर्माण करतात, अशा लोकांना जे मदत करतात त्या सगळ्या लोकांवर कारवाई केली जाईल. सायबरचा अहवाल सर्वांच्या समोर आहे. दोन्ही बाजूचे कट्टरपंथी असून त्यांच्यावर निश्चित कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री ठाकूर (Yashomati Thakur) यांनी स्पष्ट केले.

अधिकारी ही कारवाईचे फेऱ्यात -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अमरावतीच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मोर्चाच्या परवानगीवर प्रश्न केला होता. कोणीही मोर्चाला परवानगी दिली नव्हती. परवानगी नाकारली होती. त्या ठिकाणी इंटेलिजेंस फेल झाले ते का झाले याचे आश्चर्य आहे, याबाबत चौकशी केली जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॅबिनेटमध्येही यावर चर्चा घडवून कारवाईची मागणी करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज रविवारी अमरावतीतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्य सरकारवर व पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे.

Last Updated : Nov 21, 2021, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.