ETV Bharat / city

Women Hospital Security Fund: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुव्यवस्थेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले एक कोटी रुपये - अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय

अमरावती : अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात (Amravati District Women Hospital sefty) बेबी केअर सेंटरला शॉर्टसर्किटमुळे आग (Baby Care Center fire Amravati) लागल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात सुव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एक कोटी रुपये मंजूर केले (One crore sanctioned by Fadnavis) आहे. याबाबत बडनेराचे आमदार रवी राणा यांनी माहिती दिली आहे.

Women Hospital Security Fund
Women Hospital Security Fund
author img

By

Published : Sep 25, 2022, 3:27 PM IST

Updated : Sep 25, 2022, 5:14 PM IST

अमरावती : अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात (Amravati District Women Hospital sefty) बेबी केअर सेंटरला शॉर्टसर्किटमुळे आग (Baby Care Center fire Amravati) लागल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात सुव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एक कोटी रुपये मंजूर केले (One crore sanctioned by Fadnavis) आहे. याबाबत बडनेराचे आमदार रवी राणा यांनी माहिती दिली आहे.

बेबी केअर सेंटर मध्ये होते 35 नवजात बालक : जिल्हा स्त्री रुग्णालयातील बेबी केअर सेंटर मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली यावेळी या सेंटरमध्ये एकूण 35 नवजात बालक होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात पोहोचल्या. डॉक्टरांसह रुग्णालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी अतिशय शिताफीने आणि धावपळ करीत सर्व 35 नवजात बालकांना बेबी केअर सेंटरमधून काढून सुरक्षित ठिकाणी नेले. आगीमुळे लागलेल्या धुराने चार बालकांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यापैकी दोघांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तर इतर दोघांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बेबी केअर सेंटर मधील सर्व बालकांना लगतच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले असून सर्वच बालकांची प्रकृती सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुव्यवस्थेविषयी माहिती देताना आमदार रवी राणा आणि प्रवीण पोटे

आमदार रवी राणा, आमदार प्रवीण पोटे पोहोचले रुग्णालयात - जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची माहिती मिळताच बडनेराचे आमदार रवी राणा तसेच विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे हे जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात पोहोचले. यावेळी दोन्ही आमदारांनी बेबी केअर सेंटरची पाहणी केली.

नाना पटोले यांच्या विधानावर दोन्ही आमदारांचा आक्षेप - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. हा प्रकार अतिशय चुकीचा असून यामुळे कुठल्याही जिल्ह्याचा योग्य विकास होऊ शकत नाही. नियोजनाचा सुद्धा बोऱ्या वाजेल असा आक्षेप जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला भेट दिली असता घेतला होता. नाना पटोले यांच्या वक्तव्याचा आमदार प्रवीण पोटे यांनी निषेध केला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या नियोजनाकडे योग्य लक्ष देतील नाना पाटोळे यांनी अजिबात काळजी करू नये असे स्पष्ट केले. तर आमदार रवी राणा यांनी जो व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्र सांभाळू शकतो त्याच्यासाठी पाच जिल्हे हाताने काही मोठी बाब नाही. नाना पटोले हे विरोधी पक्ष नेते असल्यामुळे ते सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे देखील आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Sep 25, 2022, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.