ETV Bharat / city

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना मुंबईत हलविले, एनआयए न्यायालयासमोर हजर करणार - उमेश कोल्हे हत्या आरोपी एनआयए चौकशी

उमेश कोल्हे हत्याकांडाशी संबंधित सातही आरोपी आता एनआयएच्या ताब्यात ( Accused in Umesh Kolhe murder case shifted to Mumbai ) असून त्यांना मुंबईला हलवण्यात आले. शुक्रवारी मुंबईतील एनआयए न्यायालयासमोर ( Umesh Kolhe murder case accused NIA custody ) त्यांना हजर करण्यात येणार आहे. तसेच, या प्रकरणात आठवा आरोपी असल्याचे ( Umesh Kolhe murder case NIA court ) निष्पन्न झाले असून त्याचा शोध सुरू आहे.

accused in Umesh Kolhe murder case shifted to Mumbai
उमेश कोल्हे हत्या आरोपी एनआयए चौकशी
author img

By

Published : Jul 7, 2022, 6:46 AM IST

अमरावती - अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे ( Accused in Umesh Kolhe murder case shifted to Mumbai ) हत्या प्रकरणातील सातही आरोपींना एनआयएने आपल्या ताब्यात घेतले असून, काल या सर्व सातही आरोपींना ( Umesh Kolhe murder case accused NIA custody ) अमरावतीवरून मुंबईत हलविण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणात आठवा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा ( Umesh Kolhe murder case NIA court ) शोध सुरू आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - Umesh Kolhe PM Report : उमेश कोल्हेंचा पीएम रिपोर्ट; कॅरोटीन धमनी कापल्याने मृत्यू, राज्यभरात अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन

आरोपींना शुक्रवारी एनआयए न्यायालयासमोर हजर करणार - उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना शुक्रवारी आठ जुलै रोजी मुंबईतील न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन जुलै रोजी एनआयएकडे सोपविला होता. त्यामुळे, 4 जुलै रोजी सातही आरोपींचा ताबा आपल्याला मिळावा असा अर्ज एनआयएने स्थानिक न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने एनआयएचा अर्ज ग्राह्य मानून सातही आरोपींना चार दिवसांचा ट्रांजिट रिमांड मंजूर केला. बुधवारी सकाळी या सातही आरोपींची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अमरावती पोलिसांनी दिलेल्या वाहनातून मुंबईकडे हलविण्यात आले.

आठव्या आरोपीचा युद्ध स्तरावर शोध - उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आणखी आठवा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याचे नाव शमीम असे आहे. सध्या फरार असणारा शमीम याच्या अल करीम नगर येथील घराची एनआयए पथकाने झाडाझडती घेतली. मात्र, तो कुठे आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही. आठ जुलैला या प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयए न्यायालयासमोर हजर करायचे असल्यामुळे शमीमचा शोध युद्ध स्तरावर घेतला जात आहे.

उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा समर्थनार्थ केली होती पोस्ट : पशूंच्या औषधांचे विक्रीचे दुकान उमेश कोल्हे हे अमरावती तहसील परिसरात चालवत होते. डॉक्टर युसुफ खान हा त्यांच्याकडून नियमित औषधे खरेदी करायचा. उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली असून, त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. डॉक्टर युनूफ खान याने उमेश कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इतर ठिकाणी त्या शेअर केल्या होत्या.

असा रचला हत्येचा कट : यानंतर शेख इरफान शेख रशीद याने उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला. या कटात शोएब खान, मुदलीस अहमद, आतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण आणि डॉक्टर युसुफ खान हादेखील सहभागी झाला. यानंतर उमेश कोल्हे हे आपले औषधीचे दुकान कधी उघडतात, कधी बंद करतात ते कोणत्या मार्गाने घरी जातात याची संपूर्ण माहिती शेख इरफान शेख रशीद यांनी काढली. यानंतर 21 जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे हे औषधीचे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले.

दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी साधला डाव : उमेश कोल्हे यांच्यासोबतच दुसऱ्या दुचाकीवर त्यांचा मुलगा आणि सून हेदेखील होते. श्याम चौक परिसरातील घंटी घड्याळलगत त्यांची दुचाकी अडवून त्यांचा गळा चिरण्यात आला. उमेश कोल्हे यांच्या दुचाकीच्या मागे काही अंतरावर असणारा त्यांचा मुलगा आणि सून हे घटनास्थळी पोहचताच त्यांना उमेश कोल्हे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. उमेश कोल्हे यांच्या मुलाने परिसरातील काही व्यक्तींच्या मदतीने लगतच्या खासगी रुग्णालयात उमेश कोल्हे यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कनेक्शन : नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्यांना जिवे मारण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही कनेक्शन आहे का? याचा तपास आता सुरू झाला आहे. उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल याची हत्यादेखील नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच घडली होती. यासह अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केली त्यांना त्वरित माफी मागावी, अशी धमकी मिळाली असल्यामुळे अनेकांनी माफीदेखील मागितली आहे. शेख इरफान शेख रहीम हा एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले असून, त्याच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसा पुरवण्यात आला आहे का? याचा तपास देखील केला जाणार आहे.

हेही वाचा - Ravi Rana : उमेश कोल्हे हत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मविआच्या नेत्यांसह आयुक्तांची चौकशी व्हावी - आमदार रवी राणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.