ETV Bharat / city

'प्रश्नचिन्ह'ला मिळणार का न्याय ? विद्यार्थ्यांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या - प्रश्नचिन्ह शाळा मंगरूळ चव्हाळा

अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासे पारधी मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी मतीन भोसले यांनी 'प्रश्नचिन्ह' नावाची शाळा सुरू केली. २०१६ ला 'समृद्धी महामार्ग' शाळेजवळून जात असल्याने शाळेचा काही भाग तोडण्यात आला होता.

agitation faseparadhi samaj collectors office amravat
विद्यार्थ्यांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
author img

By

Published : Mar 10, 2020, 11:00 AM IST

Updated : Mar 10, 2020, 1:26 PM IST

अमरावती - मंगरूळ चव्हाळा येथे फासे पारधी मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी मतीन भोसले यांनी 'प्रश्नचिन्ह' नावाची शाळा सुरू केली. २०१६ ला 'समृद्धी महामार्ग' शाळेजवळून जात असल्याने शाळेचा काही भाग तोडण्यात आला. तरिही फासे पारधी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात राहावी, यासाठी मतीन भोसले यांनी पर्यायी व्यवस्था करून मुलांना शिकवणे सुरू ठेवले.

मंगरूळ चव्हाळा येथे फासे पारधी समाजातील मुलांनी 'प्रश्नचिन्ह' शाळेसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले...

पर्यायी ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवणे सुरु असताना, शाळेलगत असलेला महावितरणचा विज पुरवणी संच (डीपी) समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांनी चोरला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे शाळेचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी शाळेतील विद्यार्थी व पालकांनी सोमवारी सकाळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत, ठिय्या मांडला आहे.

prashnachinha school
फासे पारधी समाजातील मुलांसाठी चालवण्यात येणारी 'प्रश्नचिन्ह' शाळा

हेही वाचा... 'सावकारी कर्जमाफी योजना तर आमच्या सरकारच्या काळातील '

समृद्धी महामार्गातील कंत्राटदारांच्या त्रासाला कंटाळून संस्थाध्यक्ष मतीन भोसले यांनी समृद्धी महामार्गावर गेल्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र, याची दखल न घेतल्याने त्यांनी विद्यार्थ्यांसह अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. फासे पारधी समाजातील मुले अनेक अडचणींचा सामना करून शिक्षण घेत असताना या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करून काय साध्य होणार आहे ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Last Updated : Mar 10, 2020, 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.