अमरावती : बुधवारी रात्री चाकूच्या धाकावर घरात शिरून अल्पवयीन युवतीचे नवीन खान या व्यक्तीने अपहरण (accused kidnapped minor girl) केले. त्यानंतर या व्यक्तीने गुरुवारी रात्री सदर युवतीला तिच्या घराच्या परिसरात आणून सोडले. त्यानंतर जमावाने त्याला घेरले व मारहाण करून त्याची हत्या (accused killed by a mob mob in Amravati) केली. या संपूर्ण प्रकारामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात खळबळ उडाली आहे.
असे आहे प्रकरण - बुधवारी रात्री नवीन खान याच्यासह शेख अश्पाक अतुल कुसराम आणि चांदुरवाडी येथील एका युवकाने एका चांदुर रेल्वे येथील गारुडीपुरा परिसरातील एका घरात शिरून कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवला. त्यांच्या मुलीला जबरदस्तीने घराबाहेर काढून तिला वाहनात कोंबली आणि पळून गेले होते. या खळबळजनक प्रकारानंतर गारुडी पुरा येथील शेकडो नागरिकांनी चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला (Kidnapping in Amravati) होता.
गुरुवारी रात्री अपहरण करणाऱ्याची हत्या - नवीन शेख हा घेवून तिला घेऊन गुरुवारी रात्री दारुड्या परिसरात आला. अल्पवयीन तरुणीला तिथेच सोडून तो पळत असताना परिसरातील नागरिकांनी त्याला घेरले आणि बेदम मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत नवीन शेख ठार (accused killed by a mob) झाला.
यानंतर कुटुंबियांनी चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भादंवी कलम 363, 452, 506, 34 तसेच शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.