अमरावती - शहरातील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री हत्या करण्यात आली होती. तपासात नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केल्याच्या रागातून त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत शहीम अहमद याच्यासह ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला शहीद अहमद फरार होता. एनआयएने त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीससुद्धा जाहीर केले होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच शहीम अहमद याने एनआयएसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर एनआयएचे पथक आज, मंगळवारी शहीम अहमदला घेऊन अमरावतीत दाखल झाले.
आरोपींची लिंक ही आंतरराष्ट्रीय टेररिझम सोबत - उमेश कोल्हे हत्याकांडामध्ये एनआयएला उद्या तपासाला 180 दिवस पूर्ण होत असल्याने त्यांना आरोप पत्र दाखल करणे अवश्यक होते. मात्र एनआयएने सोमवारी सत्र न्यायालयात अर्ज करून या प्रकरणात आणखी 180 दिवस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे. एनआयए असा युक्तिवाद केला की, या प्रकरणांमध्ये आरोपींकडून कुठल्याही प्रकारचे तपासात सहकार्य मिळत नाही आहे. तसेच आरोपींची लिंक ही आंतरराष्ट्रीय टेररिझम सोबत असल्याचे देखील पुरावे मिळाले आहे, असा दावा एनआयए केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी तपास करणे बाकी असल्याने मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण? - नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.