अमरावती : महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या पून्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे असले तरी ज्या अमरावती जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट ( Second wave of corona from Amravati district ) देशभर पसरल्याचा दावा करण्यात आला होता. त्या अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र कोरोना नियमांना चक्क हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. कारण रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र नोंदणीसाठी आलेल्या रुग्णांची मोठी गर्दी ( Amravati Large crowd for disability certificate registration ) होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी मात्र रुग्णालय प्रशासनाने कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
बुधवार असल्याने झाली होती गर्दी -
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना नियमांचा फज्जा; अपंग प्रमाणपत्र नोंदणीसाठी मोठी गर्दी - अमरावती जिल्ह्यात ४७ नव्याने कोरोना बाधित
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ( Amravati District General Hospital ) कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र नोंदणीसाठी काऊंटरची ( Disability Certificate Registration ) संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र नोंदणीसाठी आलेल्या रुग्णांची मोठी गर्दी झाली होती.