ETV Bharat / city

Amravati accident : अमरावतीत कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू - Major accident

अमरावतीतील ( Amravati accident ) परतवाडा- बैतूल मार्गावरील निभोंरा फाट्याजवळ भीषण अपघात ( terrible accident ) झाला आहे. रात्री उशिरा झालेल्या या अपघतात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी आहे

भीषण अपघात
भीषण अपघात
author img

By

Published : Jul 18, 2022, 12:30 PM IST

Updated : Jul 18, 2022, 1:19 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यात ( Amravati accident ) परतवाडा बैतूल मार्गावर दुचाकी आणि कारचा रात्री भीषण अपघात ( terrible accident ) झाला आहे. या अपघातात एकूण 6 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये बोदड, खरपी, बहिरम ,येथील नागरिकांचा समावेश आहे. दुचाकी आणि कारच्या अपघातात 6 जणांना जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीमध्ये अडकून होते. या मार्गावरील वाहतूकही बराच वेळ विस्कळीत झाली होती.

अशी आहे घटना - रविवारी रात्री मुसळधार पाऊस ( heavy rain ) सुरू असताना सुरेश शनवारे आणि पांडुरंग शनवारे दोघे भाऊ परत वाड्याला विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणारी इनोव्हा गाडी त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चुराडा होऊन ईनोवा गाडी सुद्धा रस्त्याखाली पलटली आहे. या अपघातात बोराळ येथील रहिवासी असणारे दुचाकीस्वार सुरेश शनवारे आणि पांडुरंग शनवारे यांच्यासह इनोवामध्ये स्वार असणारे रमेश धुर्वे, सुरेश निर्मळ, अक्षय देशकर, प्रतीक मांडवकर हे घटनास्थळीच ठार झाले आहेत. तर संजय गायन ही व्यक्ती गंभीर जखमी झाली.

शिरजगाव पोलीस घटनास्थळी दाखल - अपघाताची माहिती मिळतात शिरजगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. या अपघातात जखमी असणाऱ्या संजय गायन यांनी उपचारासाठी पोलिसांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले आहे. या भीषण अपघातामुळे परतवाडा बैतुल हा मार्ग काही वेळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

हेही वाचा - Bus Fell In Narmada River : अंमळनेरला जाणारी बस नर्मदा नदीत कोसळली, १3 जणांचा मृत्यू

Last Updated : Jul 18, 2022, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.