ETV Bharat / city

अपहरणकर्ता नईम खानच्या हत्येप्रकरणी ४ जणांना अटक; हत्याकांडाने हादरला जिल्हा - murder of kidnapper Naeem Khan

नईम खान याची हत्या कोणी केली असा प्रश्न पडला असताना अमरावती पोलिसांनी या हत्येचा उलगडा ६ तासात केला. या प्रकरणी चार आरोपींना गजाआड केले आहे.

अपहरणकर्ता नईम खानच्या हत्येप्रकरणी ४ जणांना अटक

author img

By

Published : Sep 24, 2022, 2:15 PM IST

अमरावती - चांदुर रेल्वे शहरातील कुख्यात गुंड व मुलीचे अपहरणकर्ता नईम खान याची हत्या कोणी केली असा प्रश्न पडला असताना (murder of kidnapper Naeem Khan) अमरावती पोलिसांनी या हत्येचा उलगडा अवघ्या ६ तासात केला. या प्रकरणी चार आरोपींना गजाआड केले (4 people arrested in connection murder).आज शनिवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. चांदुर रेल्वे येथील कुख्यात गुंड नईम खान रहमान खान याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याच्या शरीरावर चाकूचे असंख्य वार असल्याचे पोलीस पंचनाम्यात पुढे आले होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २३ रोजी चांदुर रेल्वे येथे नईम खान रहेमान खान याच्या हत्येवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक व पोलिस स्टेशन, चांदुर रेल्वे येथील पथकाव्दारे तपासादरम्यान दि. २१ रोजी मृत नईम खान रहेमान खान याने त्याचे काही साथीदारांसह गारूडी मोहल्ला, चांदुर रेल्वे येथील एका अल्पवयीन मुलीच जबरदस्तीने अपहरण केले होते. यावरून चांदुर रेल्वे येथे आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करून पिडीता व आरोपी यांचा शोध सुरू होता. २३ तारखेला सकाळी आरोपीने साथीदारासह चांदुर रेल्वे येथे पिडीतेला घराजवळ सोडून दिले. त्यादरम्यान या मोहल्लामध्ये हजर असलेले मो. आशिक अब्दुल कादर, वय ४२ वय २६ वर्षे, रा. चांदुर रेल्वे , अफजल खा युसुफ खा मदारी, वय २७ वर्षे, रा. चांदुर रेल्वे , साजीद उमर उर्फ पप्पु फारूख शेख, वय ४१ वर्षे, रा. चांदुर रेल्वे, दीपक रतन पवार, वय २८ वर्षे, रा. चांदुर रेल्वे यांच्यासोबत नईम खान रहेमान खान यांनी वाद करून आरोपीनी नईम खान रहेमान खान यास ठार मारले. या माहितीवरून सर्व आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांनी नंतर गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर आरोपीतांना पुढील कारवाई कामी चांदुर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) व पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक तस्लिम शेख, पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर व त्यांचे पथकातील अंमलदार तसेच सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार, मनोज सुरवाडे, सहायक पोलिस निरीक्षक गिता तांगडे, पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांनी केली. सायबर सेलची तपासात मदत झाली.

या घटनेची माहिती मिळताच ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज शनिवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.