अमरावती : मौज मस्ती साठी आणि आपले शौक पूर्ण करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही.आता हेच बघा ना अमरावती शहरातील एका अल्पवयीन बालकाने मौज मस्तीसाठी शहरातून एक-दोन नव्हे तर तब्बल १८ सायकली ( Bycycle ) चोरल्यात. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या अल्पवयींनाला ताब्यात देण्यात आले असून त्याच्याकडून १८ सायकली जप्त ( 18 Bycycle Recovered ) करण्यात आल्या आहेत. ( 18 Bycycle Recovered From Minor In Amravati )
वेगवेगळया ठिकाणाहुन सायकली चोरी - प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, अमरावती शहर गुन्हेशाखेचे पथक आयुक्तालय हददीत दैनंदिन पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहीती मिळाली कि, एक विधीसंघर्षीत बालक हा पोलीस आयुक्तालय हददीत वेगवेगळया ठिकाणाहुन चोरलेल्या सायकली स्वतः चालवित आहे. इतर सायकली स्वतः जवळ ठेवल्या आहेत. अशा माहीती वरून विधीसंघर्षीत बालकासह त्यास विश्वासात घेवुन चोरी गेलेल्या सायकल संदर्भात विचारपुस केली. त्याने आयुक्तालय हददीतील वेगवेगळया ठिकाणाहुन चोरी केल्याचे कबुल केले वरून त्याचे ताब्यातुन एकुण १८ सायकल अंदाजी किंमत १,८०,०००/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे.
जप्त ऐवज राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन - जप्त करण्यात आलेला मुददेमाल पुढील कार्यवाही करीता पो.स्टे.राजापेठ येथे देण्यात आले. सदरची कार्यवाही मा. डॉ. आरती सिंह मॅडम पोलीस आयुक्त अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेशाखा श्री. प्रशांत राजे व पोलीस निरीक्षक श्री अर्जुन ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा अमरावती शहर येथील पोउपनि राजकिरण येवले, पो.हे.कॉ राजेश राठोड, ना.पो.कॉ. गजानन ढेवले नापोकॉ निलेश जुनघरे, नापोकॉ सैयदइमरान, पोकॉ चेतन कराडे, चालक पोकॉ अमोल, प्रशांत यांनी केली आहे.