ETV Bharat / city

MSRTC Workers Strike : अमरावती आणि बडनेरा आगारातील 130 गाड्या रस्त्यावर येण्याच्या प्रतिक्षेत

author img

By

Published : Dec 6, 2021, 7:58 PM IST

महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (MSRTC Workers Strike) सुरू असल्यामुळे अमरावती आगारात (Amravati Bus Stand) 75 गाड्या आणि अमरावती आगार क्रमांक दोन बडनेरा (Badnera Busstand) येथे 55 गाड्या उभ्याच आहे. या गाड्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.

st workers strike in maharashtra
st workers strike in maharashtra

अमरावती - महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (MSRTC Workers Strike) सुरू असल्यामुळे अमरावती आगारात (Amravati Bus Stand) 75 गाड्या आणि अमरावती आगार क्रमांक दोन बडनेरा (Badnera Busstand) येथे 55 गाड्या उभ्याच आहे. आता या गाड्या कधी धावतील याची प्रतीक्षा सर्वांनाच असताना या गाड्या आगाराबाहेर पडतील तेव्हा सुरळीत असाव्यात, यासाठी दोन्ही बसस्थानकावर या गाड्यांचे मेंटेनन्स केले जात आहे.

प्रतिक्रिया

उभ्या असणाऱ्या गाड्यांची घेतली जात आहे काळजी -

अमरावती आगारामध्ये एकूण 75 गाड्या उभ्या आहेत, तर बडनेरा आगारात 55 गाड्या उभ्या आहेत. या गाड्या धावत नसल्यामुळे त्यांचे इंजन खराब होऊ नये, यासाठी डेपो मॅनेजर, आगार व्यवस्थापक तसेच वाहन परीक्षक सातत्याने काळजी घेत आहेत. दिवसातून दोन वेळा या या सर्व गाड्या चालू करून बंद केल्या जात असल्याची माहिती संपातून माघार घेऊन कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

तीन गाड्यांची बॅटरी लो -

अमरावती आगारात उभ्या असणाऱ्या 75 पैकी 3 गाड्यांची बॅटरी लो झाली आहे. इतर गाड्या मात्र सुव्यवस्थित आहेत. सर्व गाड्यांची बॅटरी नियमित तपासली जात आहे. लॉकडाऊनच्या काळातही आगारातील सर्व गाड्यांच्या मेंटेनन्सवर आम्ही लक्ष देत होतो, असे अमरावती आगारातील अभियंत्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. संपातून माघार घेऊन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यास वरिष्ठांनी बंधने घातली असल्याचेही सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

तीस कर्मचाऱ्यांची संपातून माघार -

अमरावती आगारात कार्यालयीन कर्मचारी असणाऱ्या 30 जणांनी संपातून माघार घेतली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये 19 टीसी आणि इतर 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

चालक वाहक संपाच्या भूमिकेवर ठाम -

महिनाभरापासून संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला असला, तरी अमरावती जिल्ह्यातील एसटीच्या चालक वाहकांनी संपाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची हाल होत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असणारे परिवहन मंत्री आपली जबाबदारी विसरले असल्याबाबत कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा निषेध नोंदविण्यात येत आहे. एसटीचे राज्य शासनाचे विलगीकरण होईस्तोवर आमचा संपर्क कायम राहील, असे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सतीश कडू यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले आहे.

लालपरी लवकर धावावी -

महिनाभरापासून आमची लालपरी रस्त्यावर धावली नाही. यामुळे माझ्यासह अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खासगी गाड्या तिप्पट आणि चौकट पैसे उकळत आहेत. प्रवाशांचे हाल होत असून एसटी कर्मचाऱ्यांचा संप त्वरित संपावा आणि आमची लालपरी लवकरच रस्त्यावर धावावी, अशी अपेक्षा रामेश्वर श्रीनाथ या प्रवाशाने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा - MSRTC Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न.. यापुढे सीएनजी किंवा इलेक्ट्रिक बसेस धावणार - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.