ETV Bharat / city

Corona Virus Death : अमरावतीत कोरोनामुळे बारा वर्षीय मुलीचा मृत्यू

author img

By

Published : Apr 28, 2022, 7:24 PM IST

अमरावती शहरातील जिल्हा कोविड रुग्णालयात आज ( 28 एप्रिल ) कोरोनामुळे बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला ( 12 Year Old Girl Death From Corona ) आहे.

amravati
amravati

अमरावती - अमरावती शहरातील जिल्हा कोविड रुग्णालयात आज ( 28 एप्रिल ) कोरोनामुळे बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला ( 12 Year Old Girl Death From Corona ) आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या घाटलाडकी येथील रहिवासी होती.

या मुलीला 25 एप्रिलला प्रकृती बिघडल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज ( 28 एप्रिल ) दुपारी मात्र तिची प्राणज्योत मालवली. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच अमरावतीत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दोन महिन्यांपासून एकही रुग्ण नाही - जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1593 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्या बाहेरून अमरावतीत उपचारासाठी आलेले 32 जण अमरावतीत दगावले आहेत. गत सहा महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने खाली आली. तसेच, गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, कोरोनामुळे दगावलेल्या मुलीला संसर्गाची लागण नेमकी कुठून झाली याची माहिती घेण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही लहान मुलांचे लसीकरण युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पौनित कौर यांनी दिले आहेत.

हेही वाचा - Maharashtrian Family Suicide : महाराष्ट्रीयन कुटुंबाची भुवनेश्वरमध्ये गळफास घेत आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.