नवी दिल्ली Year Ender 2023 : आज आम्ही तुम्हाला अशा १० भारतीय कंपन्यांबद्दल सांगणारे आहोत, ज्यांचं मार्केट कॅप (कंपनीच्या सर्व शेअर्सचं एकूण मूल्य) यावर्षी म्हणजेच वर्ष २०२३ मध्ये सर्वाधिक होतं. या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक आघाडीवर आहेत.
- रिलायन्स इंडस्ट्रीज (RL) - मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. कंपनीची स्थापना सन १९९७ मध्ये झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, मार्केट कॅपनुसार भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, कापड, नैसर्गिक संसाधनं आणि दूरसंचार यासह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. रिलायन्सच्या मार्केट कॅपबद्दल बोलायचे तर ते १७.४८ ट्रिलियन आहे.
- एचडीएफसी बँक (HDFC Bank) - एचडीएफसी बँकेचे सध्याचे सीईओ शशिधर जगदीशन आहेत. कंपनीची स्थापना १९९४ साली झाली. भारतातील खासगी बँकांमध्ये सर्वात मोठी मालमत्ता असलेली HDFC बँक विविध प्रकारचे वित्तीय उत्पादनं आणि सेवा ऑफर करते. या बॅंकेची किरकोळ आणि कॉर्पोरेट बँकिंग या दोन्ही क्षेत्रात मजबूत उपस्थिती आहे. १ जुलै २०२३ ला बँकेचं तिच्या मूळ कंपनी एचडीएफसी लिमिटेडमध्ये विलीनीकरण झालं. या कंपनीचं मार्केट कॅप १२.६२ ट्रिलियन आहे.
- आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) - आयसीआयसीआय बँकेचे सध्याचे सीईओ संदीप बक्षी आहेत. कंपनीची स्थापना १९९४ साली झाली. ICICI बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ही बँक कॉर्पोरेट आणि सामान्य ग्राहकांना विविध बँकिंग उत्पादनं आणि वित्तीय सेवा प्रदान करते. ICICI बँकेचं मार्केट कॅप ७.१० ट्रिलियन आहे
- इन्फोसिस (Infosys) - इन्फोसिसचे सध्याचे सीईओ सलील पारेख आहेत. कंपनीची स्थापना १९८१ साली झाली. ही कंपनी डिजिटल सेवांच्या क्षेत्रात अग्रगण्य मानली जाते. यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक, तसेच त्यांच्या पत्नी आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांचे देखील या कंपनीत शेअर्स आहेत. इन्फोसिसचं मार्केट कॅप ६.४८ ट्रिलियन रुपये आहे.
- हिंदुस्तान युनिलिव्हर (Hindustan Unilever) - रोहित जावा हे हिंदुस्तान युनिलिव्हरचे सध्याचे सीईओ आहेत. कंपनीची स्थापना १९३३ साली झाली. हिंदुस्तान युनिलिव्हर ही भारतीय ग्राहकांसाठी वस्तू बनवते. ही ब्रिटिश-डच कंपनी युनिलिव्हरची उपकंपनी आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर अंतर्गत अनेक ब्रँड्सम येतात. यामध्ये लक्स, डव्ह, लिप्टन, विम, किसान, ब्रू, क्लोज अप, क्लिनिक प्लस आणि पॉन्ड यांचा समावेश आहे. जर आपण या कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल बोललो तर ते ६.०२ ट्रिलियन रुपये आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) - एसबीआयचे वर्तमान अध्यक्ष दिनेश कुमार खारा आहेत. कंपनीची स्थापना १९५५ साली झाली. SBI ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेच्या सर्वसमावेशक सेवांमध्ये वैयक्तिक बँकिंग, कृषी बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि एनआरआय सेवांचा समावेश आहे. एसबीआयचं मार्केट कॅप ५.८३ ट्रिलियन रुपये आहे.
- भारती एअरटेल (Bharti Airtel) - भारती एअरटेलचे सध्याचे सीईओ गोपाल विट्टल आहेत. कंपनीची स्थापना १९५५ साली झाली. भारती एअरटेल ही आशिया आणि आफ्रिकेतील १८ देशांमधील आघाडीची दूरसंचार कंपनी आहे. ही कंपनी मोबाइल व्हॉइस आणि डेटा सेवा, फिक्स्ड लाइन, हाय-स्पीड ब्रॉडबँड, आयपीटीव्ही, डीटीएच आणि एंटरप्राइझ सेवा प्रदान करते. या कंपनीचं मार्केट कॅप ५.७८ ट्रिलियन डॉलर आहे.
- आयटीसी (ITC) - संजीव पुरी ITC चे सध्याचे सीईओ आणि अध्यक्ष आहेत. कंपनीची स्थापना १९१० मध्ये झाली. ITC हा FMCG, हॉटेल्स, पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग, कृषी-व्यवसाय आणि माहिती तंत्रज्ञानासह एक बहु-व्यवसाय समूह आहे. कंपनी प्रथम इम्पीरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणून अस्तित्वात आली होती. मात्र १९७० मध्ये तिचं नाव बदलून इंडिया टोबॅको कंपनी लिमिटेड आणि नंतर फक्त आयटीसी करण्यात आलं. आयटीसीचं मार्केट कॅप ५.७० ट्रिलियन रुपये आहे.
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) – सध्या टाटा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन आहेl. कंपनीची स्थापना 1968 साली झाली. TCS ही टाटा समूहाची उपकंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते. कंपनी विविध IT सेवा, सल्लामसलत आणि व्यवसाय समाधानं प्रदान करते. टाटाचं मार्केट कॅप २.६७ ट्रिलियन रुपये आहे.
- बजाज फायनान्स - बजाज फायनान्स लिमिटेडचे सध्याचे सीईओ राजीव जैन आहेत. कंपनीची स्थापना १९८७ साली झाली. बजाज फायनान्स लिमिटेड ही भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये नोंदणीकृत नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे. ही बजाज फिनसर्व्ह लिमिटेडची उपकंपनी आहे, जी कर्ज देणं आणि ठेवी स्वीकारणं या व्यवसायात गुंतलेली आहे. बजाज फायनान्सचं मार्केट कॅप २.७४ ट्रिलियन रुपये आहे.
हे वाचलंत का :