नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे कोथिंबीरच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे दोडका व वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. फरसबी व भेंडीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ५५०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३०० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपयेस, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये. पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये.
फळभाज्यांचे दर : शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये.
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये.