नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलो प्रमाणे घेवडा व सुरणच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३९०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २९०० रुपये ते ३४०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १८०० रुपये ते २४०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ५०० रुपये ते ६०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३२०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये इतकी किंमत आहे.
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २२०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये.
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये इतकी किंमत आहे.