नवी दिल्ली: ट्विटरने व्यवसायांना गोल्ड बॅज कायम ठेवण्यासाठी व्यावसायिक आणि संस्था दरमहा $1,000 भरण्यास सांगितले आहे. पेमेंट न केल्यास गोल्ड चेकमार्क काढून घेतला जाईल. Elon Musk द्वारे संचालित कंपनीच्या ब्रँडशी संबंधित खात्यात बॅज जोडण्यासाठी दरमहा $50 ची वेगळी फी भरावी लागणार आहे. सोशल मीडिया सल्लागार मॅट नवाराने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉटने सूचित केले आहे की, Twitter दरमहा $1,000 आकारणार आहे.
Twitter दरमहा $1,000 आणि $50 प्रति महिना गोल्ड चेकमार्क पडताळणी घेणार असल्याचे नवाराने ट्विट केले आहे. संलग्न खाते व्हेरिफिकेशन करण्यासाठी जास्तीचे पैसे भरावे लागण्याबाबत ट्विटरने तात्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. लवकरच व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय केल्यास तुम्हाला तुमच्या संस्थेसाठी सुवर्ण चेकमार्क आणि सहयोगींसाठी एक बॅज मिळेल, असे Twitter ने व्यवसायांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे. व्हेरिफिकेशन संस्थांसाठी प्रति महिना $1,000 आणि एक महिन्याच्या विनामूल्य संलग्नतेसह प्रति महिना $50 अतिरिक्त संलग्न अकाउंटसाठी घेणार आहे.
ट्विटरची ब्लू व्हेरिफिकेशन सेवा: Twitter ने व्यावसायिक संस्थांच्या व्हेरिफिकेशनसाठी (पूर्वी व्यवसायासाठी ब्लू म्हणून ओळखले जाणारा) गोल्ड बॅज आणला आहे. ज्यामुळे ब्रँड्सना Twitter वर स्वतःची ओळख आणि वेगळेपणा दाखवता येत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, ट्विटरने व्हेरिफाईसह आपली ब्लू सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा सुरू केली. ज्याची किंमत अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी $8 आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी प्रति महिना $11 होती. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने आपली BlueService सदस्यता सेवा आणखी सहा देशांमध्ये विस्तारली आहे. यामुळे एकूण 12 देशांमध्ये यूजर्स त्याचे सदस्यत्व घेऊ शकतात.
ट्विटर ब्ल्यू युजर्सना मिळत आहे अनेक सुविधा: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्विटरने त्यांच्या ब्लू टिक सेवेसाठी सुविधांची यादी जाहीर केली होती. या सेवेच्या ग्राहकांना संभाषणात प्राधान्यक्रमांक मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार ग्राहक वेबसाईटवरून 60 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ 1080p रिझोल्यूशन आणि 2GB फाइल आकारात अपलोड करू शकतात. परंतु सर्व व्हिडिओंनी कंपनीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच सर्चमध्येही प्राधान्य मिळत आहे. सोशल मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर प्लॅटफॉर्म यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी सतत काम करत आहे. या अंतर्गत ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्विट करून घोषणा केली आहे की, लवकरच युजरला लाँग फॉर्म ट्विटची सुविधा मिळेल.