मुंबई : आज बाजार हिरव्या चिन्हाने उघडला ( Share Market Update ) . आज सेन्सेक्स 42.8 अंक म्हणजेच 0.07 टक्क्यांनी वाढला असून, 60,389.77 वर असल्याचे निदर्शनास आले. तर निफ्टी 90.25 अंकांनी वाढला ( Indian Stock Market is Still in Mood to Maintain ) असून, 0.50 अंशांने वाढून 18094.45 वर असल्याचे पाहायला मिळाले. ऑटो, फायनान्शिअल आणि पॉवर या क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी अर्धा टक्का वाढ झाली आहे.
बाजाराची सुरुवात सामान्य स्तरावर राहिली. बाजाराची सुरुवात स्थिर झाल्याने सेन्सेक्स 67.78 अंक यांनी 0.11 अंशाने वाढून 60,389.77 च्या स्तरावर असल्याचे पाहायला मिळाले. तर निफ्टी 32.50 अंकाने वाढल्याने 0.18 अंशाची वाढ झाल्याने 18034.45 वर असल्याचे पाहायला मिळाले.
भारतातील सेरेमिक आणि विट्रीफाईड टाइल बनवणाऱ्या मोठ्या कंपनी कजारिया सेरेमिक्स ( केजेसी ). ही कंपनी 2022 या वर्षी 3 रुपये प्रति शेअर चा डिविडंट देणार आहे. या कंपनीच्या शेअर होल्डरला 22 आॅक्टोबर पर्यंत डिव्हीडंट मिळणार असण्याची शक्यता आहे.