ETV Bharat / business

Share Market Update : सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स निफ्टीत तेजी, डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत - stock market news

काल आशियाई बाजारांमध्ये सेऊल, जपान, हाँगकाँग आणि शांघाय बाजार तेजीसह व्यवहार करत होते. तर अमेरिकन बाजार मात्र संमिश्र कलसह बंद झाले.

Share Market
शेयर मार्केट
author img

By

Published : Mar 28, 2023, 12:41 PM IST

मुंबई : आशियाई बाजारातील मजबूत कल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात तेजी आली आहे. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टी तेजीसह उघडले. या दरम्यान, तीस शेअर्सवर आधारित बीएसई सेन्सेक्स 295.59 अंकांनी वाढून 57,949.45 अंकांवर पोहोचला. त्याच वेळी, एनएसई निफ्टी 76.05 अंकांनी वाढून 17,061.75 अंकांवर पोहचला.

आशियाई मार्केटमध्ये तेजी : आज टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या शेअर्समध्ये तेजी होती. दुसरीकडे, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड आणि नेस्ले या कंपन्यांचे नुकसान झाले आहे. आशियाई बाजारात सेऊल, जपान, हाँगकाँग आणि शांघाय शेअर बाजारात शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. सोमवारी अमेरिकन बाजार मात्र संमिश्र कलसह बंद झाले.

सेन्सेक्स, निफ्टीतही तेजी : शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स सोमवारी 126.76 अंकांच्या किंवा 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 57,653.86 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 40.65 अंकांनी म्हणजेच 0.24 टक्क्यांनी वाढून 16,985.70 अंकांवर बंद झाला. दरम्यान, जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.29 टक्क्यांनी घसरून 77.89 डॉलर प्रति बॅरल झाला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सोमवारी 890.64 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

रुपया वधारला : देशांतर्गत इक्विटी बाजारातील सकारात्मक कल आणि अमेरिकन डॉलरमधील कमजोरी यामुळे मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 15 पैशांनी वधारून 82.16 वर पोहोचला. आंतरबँक फॉरेन एक्स्चेंज मार्केटमध्ये, रुपया डॉलरच्या तुलनेत 82.20 वर उघडला. मात्र नंतर तो 82.16 वर परत आला. अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक 0.25 टक्क्यांनी घसरून 102.59 वर आला होता. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.42 टक्क्यांनी घसरून 77.79 डॉलर प्रति बॅरलवर होते. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सोमवारी निव्वळ आधारावर 890.64 कोटी रुपयांचे समभाग विकले.

हेही वाचा : EPFO Interest Rate : ईपीएफओचा व्याजदर कमी होणार की वाढणार? आज निर्णय होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.