ETV Bharat / business

SBI on Loan to Adani: अदानींचे वासे पोकळ असतील तर एसबीआयला लागणार तब्बल 27 हजार कोटींचा चुना, कसा ते वाचाच... - अदानी समूहाला एसबीआयने दिले आहे कर्ज

अदानी ग्रुपला दिलेल्या कर्जाबाबत SBI ने मोठी माहिती दिली आहे. त्याचवेळी अदानींना दिलेल्या कर्जाचा बँकेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितले की, एसबीआयच्या एकूण कर्जामध्ये अदानी समूहाचा वाटा ०.९ टक्के आहे. मात्र अदानी यांच्याबद्दल हिंडेनबर्गचे दावे खरे ठरले तर बँकेचे मोठे नुकसान निश्चित आहे.

SBI's total exposure to Adani Group at Rs 27,000 cr; none against shares
अडचणीत असलेल्या अदानी समूहाला एसबीआयने दिले आहे कर्ज.. एकूण कर्जामध्ये आहे 'इतका' वाटा
author img

By

Published : Feb 3, 2023, 7:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 7:48 PM IST

मुंबई : एसबीआयच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, अदानी समूहाला त्यांच्या कर्जाच्या रकमेची पूर्तता करण्यासाठी कोणतेही मोठे आव्हान आहे असे आम्हाला वाटत नाही. ते म्हणाले की, आम्ही समभागाच्या बदल्यात कोणतेही कर्ज दिलेले नाही. एसबीआयने दिलेल्या एकूण कर्जांपैकी अदानींच्या कर्जाचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे ०.९ टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअरच्या किमती घसरायला लागल्या आहेत. मात्र, फिच रेटिंग एजन्सीने कंपनीला दिलासा देणारा अहवाल दिला आहे. मूडीजने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, अदानी समूहाला एक-दोन वर्षे समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांना सुमारे 27,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, जे एकूण वितरित कर्जाच्या केवळ 0.9 टक्के आहे. अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, अदानी समुहाला कर्जाची जबाबदारी पार पाडण्यात कोणतेही आव्हान येत असल्याचे बँकेला वाटत नाही. यासोबतच एसबीआयने या समूहाला शेअर्सच्या बदल्यात कोणतेही कर्ज दिलेले नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र हिंडेनबर्गचे दावे खरे ठरल्यास बँकेला मोठा फटका बसणार असे तज्ज्ञांचे मत आहे.

खारा म्हणाले की, अदानी समूहाच्या प्रकल्पांना कर्ज देताना भौतिक मालमत्ता आणि योग्य रोख प्रवाह लक्षात ठेवण्यात आला आहे. यासोबतच या समूहाचा थकीत कर्ज फेडण्याचा विक्रमही चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा फटका कर्ज देणाऱ्या संस्थांना बसू शकतो, या भीतीने समूहाने कर्जाचे पुनर्वित्त करण्याची कोणतीही विनंती केलेली नाही, असे एसबीआयचे प्रमुख म्हणाले.

यापूर्वी, देशातील सर्वात मोठी कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या (ऑक्टोबर-डिसेंबर) तिसऱ्या तिमाहीत (2022-23) त्यांचा निव्वळ नफा 62 टक्क्यांनी वाढून 15,477 कोटी रुपये झाला आहे. बँकेने शुक्रवारी ही माहिती दिली. स्टँडअलोन आधारावर एसबीआयचा निव्वळ नफा ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत वाढून रु. 14,205 कोटी झाला आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत रु. 8,432 कोटी आणि मागील जुलै-सप्टेंबर तिमाहीत रु. 13,265 कोटी होता.

स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत, बँकेने सांगितले की, तिसऱ्या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न 98,084 कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 78,351 कोटी रुपये होते. या वर्षी तिसऱ्या तिमाहीत बँकेचा परिचालन खर्च 24,317 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत 20,839 कोटी रु. तिमाहीत नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPAs) साठी तरतूद जवळपास निम्मी होऊन Rs 1,586 वर आली आहे.

हेही वाचा: Relief To Adani Group: अदानी समूहाला मोठा दिलासा.. 'या' मोठ्या संस्थेने केला मोठा दावा, आता..

Last Updated : Feb 3, 2023, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.