नवी दिल्ली: जून महिना संपयला फक्त एक दिवस बाकी आहे. त्यानंतर नवीन महिना सुरू होईल म्हणजेच जुलै. जुलै महिन्यातील सुट्टयांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आली आहे. बँकांसाठी जुलै महिना हा आनंदाचा असणार आहे. या महिन्याच्या 30 पैकी 15 दिवस बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्या राहणार आहेत. यामुळे ग्राहकांनी बँकेची कामे असतील ते सुट्टीचे वेळापत्रक पाहून पूर्ण करुन घ्यावीत. नाहीतर अनेकांना बँकेच्या कामासाठी फेऱ्या माराव्या लागतील.
बँका राहतील बंद : यामुळे जुलैमध्ये तुमचे जर बँकेशी संबंधित काही कामे असतील ते थांबवू नका, ते त्वरित निकाली काढा. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार बँकांमधील कामकाज सुमारे 15 दिवस बंद राहणार आहे. तसे पाहिले तर राज्यांनुसार, मध्यवर्ती बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. कारण प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगळ्या असू शकतात. तरीही वाचकांनो जर जुलै महिन्यामध्ये तुम्ही बँकेचे काम करणार असाल तर सुट्ट्यांचे वेळापत्रकावर एकदा नजर टाका मग कामाची योजना आखा.
इतके दिवस बँका राहतील बंद
तारीख | दिवस | कारण | राज्य |
02 जुलै | रविवार | आठवड्याची सुट्टी | सर्व राज्य |
05 जुलै | बुधवार | गुरु हरगोविंदजी जयंती | जम्मू-कश्मीर |
06 जुलै | गुरुवार | एमएचआयपी दिवस | मिझोराम |
08 जुलै | दुसरा शनिवार | आठवड्याची सुट्टी | सर्व राज्य |
09 जुलै | रविवार | आठवड्याची सुट्टी | सर्व राज्य |
11 जुलै | मंगळवार | केर पूजा | त्रिपुरा |
13 जुलै | गुरुवार | भानु जयंती | सिक्किम |
16 जुलै | रविवार | आठवड्याची सुट्टी | सर्व राज्य |
17 जुलै | सोमवार | यू तिरोट सिंग डे | मेघालय |
21 जुलै | शुक्रवार | द्रुक्पा त्शे-जी | सिक्किम |
22 जुलै | शनिवार | आठवड्याची सुट्टी | सर्व राज्य |
23 जुलै | रविवार | आठवड्याची सुट्टी | सर्व राज्य |
28 जुलै | शुक्रवार | आशूरा | जम्मू-कश्मीर |
29 जुलै | शनिवार | मोहरम | उत्तर प्रदेश, तेलंगाना, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मिजोरम, त्रिपुरा, मध्य प्रदेश, तमिलनाडु, राजस्थान, प. बंगाल, नवी दिल्ली, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश |
30 जुलै | रविवार | आठवड्याची सुट्टी | सर्व राज्य |
तरी करता येणार बँकेचे काम : देशभरातील बँक कधी बंद असतील हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आरबीआयच्या वेबसाईवर जावे लागेल. दरम्यान केंद्रीय बँक आपली सर्व माहिती या वेबसाइटवर अपलोड करत असते. सुट्ट्यांची यादीही वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. (https://www.rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) येथे क्लिक करुन जाणून घ्या सुट्ट्यांचे दिवस. दरम्यान सुट्ट्या असल्याने बँकेची कामे होणार नाहीत, असा तुमचा विचार असेल तर तो काढून टाका. कारण ऑनलाइन द्वारे तुम्ही तुमच्या बँकेतील कामे पुर्ण करू शकतात.