मुंबई : या आठवड्यात मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान सोन्याचा भाव 57,125 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. अशा परिस्थितीत भारतात बजेटआधी मात्र सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र अजूनही सोन्याचे दर 56 हजारापेक्षा कमी आहेत. बुधवारी संध्याकाळच्या व्यवहारानंतर जबरदस्त सुधारणा झाली. मात्र तरीही सोने गेल्या ४ दिवसांपासून तेजी कायम ठेवू शकलेले नाही.
काय आहे आजचा भाव?: आज सोनेचे दर स्थिर आहेत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहु या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,265, 8 ग्रॅम ₹42,120, 10 ग्रॅम ₹52,650, 100 ग्रॅम ₹5,26,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,744, 8 ग्रॅम ₹45,952, 10 ग्रॅम ₹57,440, 100 ग्रॅम ₹5,74,400 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹5,74,400, मुंबईत ₹52,650, दिल्लीत ₹52,800, कोलकाता ₹52,650, हैदराबाद ₹52,650 आहेत.
चांदीचे आजचे दर: चांदीच्या भावाचे बोलायचे झाले तर यामध्येही घसरण झाली आहे. 29 जानेवारी रोजी बाजारात चांदीच्या भावात बदल झाला नाही. यानुसार आता 1 ग्रॅम चांदीची किंमत 74.20 रुपये तर एक किलो चांदीचा भाव 72,200 रुपये इतका झाला आहे.कालपेक्षा आज चांदीच्या दरात काही बदल झालेला नाही.आज चांदी 1 ग्रॅम ₹72.20, 8 ग्रॅम ₹577.60, 10 ग्रॅम ₹722, 100 ग्रॅम ₹7,220, 1 किलो ₹72,200 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹742, मुंबईत ₹722, दिल्लीत ₹722, कोलकाता ₹722, बंगळुरू ₹742, हैद्राबाद ₹742 आहेत. हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो? : सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.
हेही वाचा :Gold Silver Rate Today आज सोने चांदीचे भाव वधारले जाणून घ्या आजचे दर