ETV Bharat / business

UPI PayNow linkage: मोबाईल नंबरवरून पाठवता येणार सिंगापूरला पैसे, डिजिटल व्यवहार झाले सोपे.. भारतीय UPI शी जोडले सिंगापूरचे PayNow - युपीआय पेनाऊ लिंकेज सुरुवात

जगभरात डिजिटल पेमेंटच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्यासोबत भारतीय पेमेंट प्रणाली UPI आणि सिंगापूरची पेमेंट प्रणाली PayNow च्या लिंकेजची प्रक्रिया सुरू केली आहे. UPI-PayNow लिंकेजमुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध सुधारणार आहेत.

PM Modi and PM of Singapore Lee Hsien Loong witness the launch of UPI-PayNow linkage between the two countries
मोबाईल नंबरवरून पाठवता येणार सिंगापूरला पैसे, डिजिटल व्यवहार झाले सोपे.. भारतीय UPI शी जोडले सिंगापूरचे PayNow
author img

By

Published : Feb 21, 2023, 12:52 PM IST

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरच्या 'पे नाऊ'चे एकत्रीकरण सुरू केले आहे. या प्रसंगी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सिंगापूरचे चलन प्राधिकरणाचे एमडी रवी मेनन यांनी दोन्ही देशांमधील UPI-PayNow लिंकेज प्रक्रियेला सुरुवात केली. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, UPI-PayNow लिंकेज भारत आणि सिंगापूर दरम्यान दोन्ही देशांतील नागरिकांसाठी एक मोठी भेट आहे, ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मी भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांतील लोकांचे अभिनंदन करतो.'

  • In past few yrs, India has given highest priority to creating a conducive environment for innovation & modernisation. With our Digital India program, Ease of Doing Business has enhanced. With this, besides digital connectivity, financial inclusion has also received a thrust: PM pic.twitter.com/CRwE1hQIb8

    — ANI (@ANI) February 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

युपीआयसाठी अनेक देशासोबत करार: UPI आणि Paynow कनेक्टिव्हिटी मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीयांना या सुविधेचा फायदा होणार आहे. UPI सेवा सुरू करण्यासाठी सिंगापूर हे नवीन नाव असू शकते, परंतु या पेमेंट सिस्टमसाठी अनेक देशांसोबत करार आधीच केले गेले आहेत. UPI आणि PayNow कनेक्टिव्हिटी दोन्ही देशांमधील व्यापारात खूप फायदेशीर ठरणार आहे.

  • Digital India program has made possible unprecedented reforms in governance and public service delivery. This is the strength of India's digital infrastructure that during COVID, we were able to make direct transfers to the bank accounts of crores of people: PM Narendra Modi pic.twitter.com/DcCMDhOdbv

डिजिटल पेमेंटमध्ये भारत आघाडीवर: जगाचा विचार केला असता भारत जगभरात डिजिटल पेमेंटमध्ये आघाडीवर आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या या प्रणालीचे कौतुक केले आहे. त्याच वेळी, देशात UPI द्वारे पेमेंटचे आकडे सतत वाढत आहेत. भारत सरकार त्याचा विस्तार करण्यावर सातत्याने भर देत आहे. कोरोना काळापासून या डिजिटल पेयमेन्टसचा वापर भारतात वाढला आहे.

मोबाईल क्रमांकावरूनही होणार व्यवहार: UPI आणि Paynow या दोन्ही देशातील कनेक्टिव्हिटीमुळे दोन्ही देशांमधील डिजिटल व्यवहार सुलभ होतील, असे पंतप्रधान मोदींनी लॉन्च इव्हेंटमध्ये सांगितले. लोक QR-कोड आधारित किंवा फक्त बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबरद्वारे व्यवहार करू शकतील. मोदी म्हणाले की, भारत आणि सिंगापूर दरम्यान फिनटेक सेवा जोडल्याने तंत्रज्ञानाला एका नव्या उंचीवर नेले जाईल.

अनिवासी भारतीय, विद्यार्थी, व्यावसायिकांना फायदा: पीएम मोदी म्हणाले की, आज दोन्ही देशांदरम्यान क्रॉस बॉर्डर फिनटेक कनेक्टिव्हिटीसह एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. आजनंतर, सिंगापूर आणि भारतातील लोक आपापल्या देशांप्रमाणेच त्यांच्या मोबाइल फोनवरून पैसे भरण्यास सक्षम असतील. पंतप्रधान म्हणाले की या सुविधेचा विशेषतः अनिवासी भारतीय, विद्यार्थी आणि इतर व्यावसायिकांना फायदा होईल.

हेही वाचा: Todays Share Market Updates: शेअर मार्केट अपडेट्स.. सुरुवातीच्या व्यवहारात रुपयाची घसरण, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.