ETV Bharat / business

Bill Gates Resume : बिल गेट्सने शेअर केला 48 वर्षापूर्वीचा रिझ्युम; नोकरी शोधणाऱ्यांना दिला खास संदेश

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी त्यांचा 48 वर्षांचा रिझ्युमे शेअर ( Bill Gates resume from 48 years ago ) केला आहे. बिल गेट्स तेव्हा हार्वर्ड विद्यापीठात प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. नोकरी शोधणारे बिल गेट्सच्या या रेझ्युमेमधून जाणून घेऊ शकतात आणि टिपा घेऊ शकतात.

Bill Gates
बिल गेट्स
author img

By

Published : Jul 2, 2022, 5:06 PM IST

Updated : Jul 2, 2022, 5:41 PM IST

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स ( Bill Gates richest businessman in the world ) यांना कोण ओळखत नाही. आता त्यांचा सुमारे पाच दशकांपूर्वीचा रेझ्युमे तरुणांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. अलीकडेच, बिल गेट्स यांनी त्यांचा 48 वर्षांचा रिझ्युमे लिंक्डइनवर शेअर केला ( Bill Gates 48-year-old resume shared on LinkedIn ) आहे. त्याने रेझ्युमे शेअर केला आणि लिहिले, 'तुम्ही नुकतेच पदवीधर असाल किंवा कॉलेजमधून बाहेर पडलेला असाल, मला खात्री आहे की तुमचा रेझ्युमे माझ्या 48 वर्षांपूर्वीच्या रिज्यूमेपेक्षा चांगला दिसत दिसेल.'

नोकरी मिळवण्यात तुमचा रेझ्युमे खूप मोठी भूमिका बजावतो. जर रेझ्युमे चांगला नसेल तर मुलाखतीपूर्वी तुमचा अर्जाची छांटणी केली जाईल. अशा परिस्थितीत नोकरी शोधणारे बिल गेट्सच्या या रेझ्युमेमधून जाणून घेऊ शकतात आणि टिप्स घेऊ शकतात.

Bill Gates resume
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स यांचा रिझ्युमे

गेट्सचा रेझ्युमे कसा आहे ते जाणून घ्या: बिल गेट्स यांनी शेअर केलेल्या 1974 च्या एका पानाच्या रेझ्युमेमध्ये त्यांचे नाव विल्यम एच गेट्स असे लिहिले आहे. गेट्स तेव्हा हार्वर्ड कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. ऑपरेटिंग सिस्टीम स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट, कंपाइलर कन्स्ट्रक्शन आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स सारखे कोर्सेस केले असल्याचे त्यांनी त्यांच्या बायोडेटामध्ये लिहिले आहे. फोरट्रान, कोबोल, एल्गोल, बेसिक इत्यादी सर्व प्रमुख प्रोग्रॅमिंग भाषांचा त्यांना अनुभव असल्याचेही लिहिले आहे.

याशिवाय गेट्स यांनी 1973 मध्ये TRW Systems Group सह सिस्टीम प्रोग्रामर म्हणून त्यांच्या अनुभवाचा उल्लेख केला आहे. 1972 मध्ये लेकसाइड स्कूल, सिएटल येथे सह-नेता आणि सह-भागीदार म्हणून त्याच्या कामाबद्दल सांगितले. बिल गेट्ससारख्या प्रेरणादायी व्यक्तीचा रेझ्युमे पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, 'तुमचा रेझ्युमे शेअर केल्याबद्दल बिल गेट्स धन्यवाद, एक पेजचा रेझ्युमे छान. आपण सर्वांनी परत जाऊन आपल्या मागील रेझ्युमेच्या प्रती पाहिल्या पाहिजेत.

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. बांगलादेशने कांदा आयात बंदी उठवली, भारतातून आजपासून निर्यात

Last Updated : Jul 2, 2022, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.