ETV Bharat / business

Today Petrol Diesel Rates:  पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या शहरांतील आजचे दर - डिझेलचा दर

रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात. यावर उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर खर्च जोडून हे दर ग्राहकांना पेट्रोल पंपावर दिसतात. वाढत्या महागाईत क्रूड ऑइलचे दर घसरल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमतीही घसरतील अशी आशा आहे. आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेवू या.

Today Petrol Diesel Rates
आजचे पेट्रोल डिझेलचे दर
author img

By

Published : Feb 7, 2023, 7:12 AM IST

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती सध्या चांगली दिसून येत नाही. परंतु याही परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था अजूनही स्थिर आणि चांगली आहे. ही भारतासाठी चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. भारत सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा देश आहे. परिणामी काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जागतिक बाजारात शनिवारी कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झालेली पाहावयास मिळाली. शनिवारी डब्ल्यूटीआय क्रूड 2.49 डॉलर म्हणजेच 3.28 टक्क्यांनी घसरून 73.39 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. क्रूड ऑईल 2.49 डॉलरने घसरले आहे. देशातील तेल कंपन्यांनी देखील पेट्रोल डिझेलच्या दरात बदल केला आहे.

Today Petrol Diesel Rates
आजचे पेट्रोल डिझेलचे दर

तुमच्या शहरांतील आजचे दर : देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल झाला आहे. पहा तुमच्या शहरांतील आजचे दर काय आहेत. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 43 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 94 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 14 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 69 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 49 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 70 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 19 पैसे आहे.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत : तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडल्यानंतर त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेणे गरजेचे असते. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवण्यात येते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल करण्यात येतो. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या म्हणून ओळखल्या जातात.

हेही वाचा : Groom Entery On Bicycle : इंधनाच्या वाढत्या दरामुळे नवरदेवाची चक्क सायकलवरून वरात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.