नवी दिल्ली: करदात्यांनो, आज प्राप्तिकर भरण्याचा शेवटचा दिवस आहे. प्राप्तिकर भरण्यासाठी शेवटचे काही तास बाकी आहेत. जर तुम्हीही प्राप्तिकर भरला नसेल त्वरीत आयकर रिटर्न भरा. दरम्यान आर्थिक वर्ष 2022-2023 साठी आतापर्यंत 5.83 कोटी प्राप्तिकर भरण्यात आले आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पगारी वर्ग आणि ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, अशा लोकांसाठी आज प्राप्तिकर भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. दरम्यान आयकर विभागाने प्राप्तिकर एक ट्विट केले की, '30 जुलै रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत 5.83 कोटी प्राप्तिकर भरण्यात आले. जे गेल्या वर्षी दाखल केलेल्या आकड्यापेक्षा हे जास्त आहे.
एका तासात 3.04 लाख आयटीआर दाखल: आयकर विभागाने सांगितले की, रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत ई-फायलिंग पोर्टलवर 46 लाखांहून अधिक अर्ज भरण्यात आले. तर शनिवारी 1.78 कोटी लोकांनी प्राप्ती कर भरला होता. ज्यात एका तासात 3.04 लाख प्राप्तिकर भरण्यात आले होते. दरम्यान सरकारने आप्राप्ती कर दाखल करण्याच्या मुदतीत कोणतीही वाढ जाहीर केलेली नाही. मात्र, यावेळी आयकर परताव्याच्या शेवटच्या तारखेत कोणतीही वाढ होणार नाही, असे सांगितले जात आहे. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की,अडचणी कितीही आल्या तरी शेवटची तारीख वाढवली जाणार नाही. दरम्यान जे करदाते आज आयटीआर भरू शकले नाहीत, त्यांना दंड भरावा लागेल.
-
📢 Kind Attention 📢
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here are some statistics of the Income Tax Returns filed.
5.83 crore #ITRs have been filed till 1 pm today (30th July) crossing the number of ITRs filed till 31st July, last year.
We have witnessed more than 46 lakh successful logins till 1 pm today and…
">📢 Kind Attention 📢
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 30, 2023
Here are some statistics of the Income Tax Returns filed.
5.83 crore #ITRs have been filed till 1 pm today (30th July) crossing the number of ITRs filed till 31st July, last year.
We have witnessed more than 46 lakh successful logins till 1 pm today and…📢 Kind Attention 📢
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 30, 2023
Here are some statistics of the Income Tax Returns filed.
5.83 crore #ITRs have been filed till 1 pm today (30th July) crossing the number of ITRs filed till 31st July, last year.
We have witnessed more than 46 lakh successful logins till 1 pm today and…
दंड द्यावा लागेल: प्राप्तिकर मुदत संपल्यानंतरही भरता येऊ शकते. याला उशिराने भरले जाणारे प्राप्तिकर म्हटले जाते. यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत आहे. पण तुम्हाला विलंब फी द्यावे लागेल. आयकर कायदा,1961च्या कलम 234F अंतर्गत 5 हजार रुपयांपर्यंतटचा दंड भरावा लागेल. दुसरीकडे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना 1 हजार रुपये दंड भरावा लागेल. प्राप्तिकर भरण्याची आजची मुदत ज्यांनी चुकवली असेल, त्या व्यक्तीला दंडाव्यतिरिक्त अधिक पैसे द्यावे लागतील. जे कर भरतात त्यांच्याकडून आयकर कायद्याच्या कलम 234A, B किंवा C अंतर्गत दंडात्मक व्याज आकारले जाईल.
हेही वाचा-