नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय किमतीतील घसरण लक्षात घेऊन सरकारने बुधवारी पेट्रोल, डिझेल, जेट इंधन आणि कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स कमी ( Government Windfall tax on fuel reduced ) केला. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या निर्यातीवरील कर प्रतिलिटर 6 रुपयांनी कमी ( Export tax on petrol Rs 6 reduced ) करण्यात आला आहे. त्याचवेळी जेट इंधन (ATF) सुद्धा 6 रुपये प्रति लिटरवरून 4 रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. डिझेलवरील कर 13 रुपये प्रति लिटरवरून 11 रुपये प्रति लीटर करण्यात आला आहे. देशांतर्गत कच्च्या तेल उत्पादनावरील 23,250 रुपये प्रति टन अतिरिक्त कर 17,000 रुपये प्रति टन करण्यात आला आहे.
जून महिन्यातील विमान प्रवास लवकरच महाग होण्याची भीती व्यक्त केली जात होती. खासगी विमान कंपनी स्पाइसजेटने इंधनाच्या वाढत्या किमती आणि घसरणाऱ्या रुपयावर चिंता व्यक्त करताना हे संकेत दिले होते. 10 ते 15 टक्के भाडे वाढवण्याची गरज असल्याचे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी सांगितले होते की, इंधनाच्या दरात झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांना तात्काळ विमान भाडे वाढवण्याशिवाय पर्याय उरला नाही. सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की ऑपरेटिंग कॉस्ट परवडण्याजोगी राहण्यासाठी विमान भाड्यात किमान 10 ते 15 टक्के वाढ ( 10-15 percent increase in air fares ) करणे आवश्यक आहे.
हेही वाचा - RBI restrictions : आरबीआयचे रायगड सहकारी बँकेवर निर्बंध!