ETV Bharat / business

'फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल' मध्ये IPhone १५ वर मिळतोय भव्य डिस्काउंट! एकदा भेट द्याच - Flipkart sale

Flipkart Republic Day Sale 2024 : 14 जानेवारीपासून फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलला सुरुवात झाली. या सेलमध्ये अनेक सवलती दिल्या जात आहेत. या सेलमध्ये, अ‍ॅप्पलचे सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन जसे की आयफोन 15 आणि आयफोन 14 सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहेत. वाचा संपूर्ण बातमी...

Flipkart Republic Day Sale 2024
Flipkart Republic Day Sale 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 9:50 PM IST

नवी दिल्ली Flipkart Republic Day Sale 2024 : प्लिपकार्टचा वर्षातील पहिला सेल सुरू झाला आहे. 14 जानेवारीपासून 'फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2024' ला सुरुवात झाली. हा सेल 19 जानेवारीपर्यंत सुरू राहील. या सेलदरम्यान केवळ स्मार्टफोनवरच नव्हे तर अ‍ॅक्सेसरीज, गृहोपयोगी वस्तू, सौंदर्य उत्पादनं, टीव्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि इत्यादी बऱ्याच काही गोष्टींवर प्रचंड सवलत आणि ऑफर उपलब्ध आहेत.

आयफोन 15 वर भव्य डिस्काउंट : या सेलमध्ये अ‍ॅप्पलचा सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन, आयफोन 15 तसेच सॅमसंगचा लोकप्रिय फोन, Samsung Galaxy S21 FE वर भव्य डिस्काउंट मिळत आहेत. सेलमध्ये लेटेस्ट iPhone 15 फक्त 65,999 रुपयात उपलब्ध आहे, जी या फोनची आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. अ‍ॅप्पल स्टोअरवर या फोनची किंमत 79,900 रुपयांपेक्षा जास्त आहे. यासह, आयसीआयसीआय किंवा बँक ऑफ बडोदाचं क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 750 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

आयफोन 14 वर देखील सूट : फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये आयफोन 15 प्रमाणेच आयफोन 14 वर देखील सूट मिळत आहे. आयफोन 14 ची किंमत 69,900 रुपये असून, या सेलमध्ये हा फोन केवळ 57,999 रुपयांना मिळणार आहे. आयफोन 15 प्रमाणे यावर देखील "Buy with Exchange" चा पर्याय उपलब्ध असेल, ज्याद्वारे ग्राहकांना डिव्हाइसवर 54,990 रुपयापर्यंत सूट मिळण्याची संधी असते.

रेडमी नोट 13 प्रो : या सेलमध्ये रेडमीचा नवीन लाँच झालेला फोन Redmi Note 13 Pro+ (8GB RAM/256GB स्टोरेज) वर देखील भव्य डिस्काऊंट उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर हा फोन 31,999 रुपयांना विक्रीला आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची इस्टंट सूट मिळणार आहे. याशिवाय, निवडक मोबाईल मॉडेल्सच्या एक्सचेंजवर अतिरिक्त 2000 रुपयांची सूट मिळेल.

हे वाचलंत का :

  1. एलपीजी सिलिंडर ते वाहन खरेदी करताना खिशावर काय होणार परिणाम? नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 'हे' होणार बदल

'फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल' मध्ये IPhone १५ वर मिळतोय भव्य डिस्काउंट! एकदा भेट द्याच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.