नवी दिल्ली Festive Season Sale 2023 : ऑक्टोबर महिना सणांचा महिना असतो. या महिन्यापासून फेस्टिव्ह सिझनला सुरुवात होते. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नवरात्री, दुर्गा पूजा, दसरा तसेच इतर अनेक सण साजरे केले जातील. या सणांच्या पार्श्वभूमीवर, अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म दरवर्षी सेलचं आयोजन करतात. या सेलदरम्यान अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात.
८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान फेस्टिव्ह सेल : या वर्षीच्या फेस्टिव्ह सिझन सेलची सुरुवात ८ ऑक्टोबरपासून होणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत हा सेल सुरू राहील. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो, या आणि अशा अनेक ऑनलाइन ई-कॉमर्स साइट्सवर फेस्टिव्ह सेलची सुरुवात होणार आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यांचा वार्षिक मेगा सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्टवर ८ ऑक्टोबरपासून 'द बिग बिलियन डेज' (TBBD) सेलला सुरुवात होईल, जो १५ ऑक्टोबरपर्यंत चालेल. त्याच वेळी, अॅमेझॉनचा 'द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' (GIF) देखील ८ ऑक्टोबरपासूनच सुरू होणार आहे. यावर्षी 'मीशो' सह नवे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला आव्हान देऊ शकतात. या प्लॅटफॉर्म्सना गेल्या वर्षी सणासुदीच्या सेलमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता.
या प्लॅटफॉर्म्सवरही सेल असेल : गेल्या काही वर्षात टाटा न्यू आणि जीओ मार्ट यांनीही ई-कॉमर्समध्ये प्रवेश केला. यासोबतच 'मिन्त्रा', 'नायका' आणि 'अजिओ' सारखे फॅशन आणि लाइफस्टाइल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म एकमेकांना खडतर आव्हान देतील. या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी वार्षिक सेल केवळ कमाईसाठी महत्वाचा नाही, तर याद्वारे हे प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांशी कनेक्ट होऊ शकतात. या सेलमार्फत हे प्लॅटफॉर्म ग्राहकांना आकर्षक सवलती देतात, ज्यामुळे त्यांना जाहिराती मिळून त्यांच्या वार्षिक विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदीदार वाढतील : गेल्या वर्षीच्या सेलच्या तुलनेत या वर्षी पुन्हा खरेदीदार वाढतील आणि विक्री २० टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. ई-कॉमर्स क्षेत्राच्या सकल व्यापार मूल्यात (GMV) वाढ यंदाच्या सणासुदीच्या हंगामातही दिसू शकते. एका अहवालानुसार, GMV मध्ये यावर्षी १८ ते २० टक्क्यांनी वाढ होऊ शकते, जी ९० हजार कोटी रुपये आहे. ही गेल्या वर्षीच्या ७६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा :
- Apple IPhone 15 Sale : पहिल्याच दिवशी आयफोन 15 च्या विक्रीनं मोडला रेकॉर्ड, आयफोन 14 पेक्षा झाली 100 टक्के जास्त विक्री
- Sugar Production Reduces : साखरेचे उत्पादन घटले : साखरेचा 'गोडपणा' झाला कमी, सरकारची चिंता वाढली?
- India US Elections २०२४ : इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळं नेमका काय फायदा होणार, वाचा खास लेख