ETV Bharat / business

New Initiative of Pune Corporation : पुणे महापालिकेच्या माध्यमातून ई-बाईक मिळणार भाड्याने; पुणे महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम

author img

By

Published : Sep 22, 2022, 10:09 AM IST

Updated : Sep 22, 2022, 11:29 AM IST

पुणे शहरात वाहतूककोंडी आणि पर्यावरणाची समस्या नेहमीच निदर्शनास येते. यावर आता पुणे महापालिकेकडून उपाय म्हणून अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. पुणे शहरात 250 वेगवेगळ्या ठिकाणी 1500 स्वॅपिंग पॉइंट्स असणार आहेत. ( EV Charging Stations in Pune ) आणखी 1000 ईव्ही चार्जिंग पॉइंट्स आणि 1500 स्वॅपिंग पॉइंट लवकरच उपलब्ध होणार आहेत.

Innovative initiative of PMC
पुणे महापालिकेच्या माध्यमातून ई-बाईक मिळणार भाड्याने

पुणे : एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला आता दुचाकीच ( EV Charging Stations in Pune ) शहर म्हणून ओळखले जाते. आता याच पुणे शहरात ई बाईक भाड्याने मिळणार ( 1500 Swapping Points Available in Pune ) आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने पुण्यातील प्रकल्प आणि ईव्ही-चार्जिंग स्टेशनचे ई-एव्ही चार्जिंग स्टेशनचे उभारणीसाठी मान्यता दिली ( 1000 EV Charging Points in Pune ) आहे. Innovative Initiative of PMC

पुणे महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम

पुणे शहरातील वाहतूककोंडी, प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा अभिनव उपक्रम : स्थायी समितीने के-फेसिंग पॉइंट्सच्या सहकार्याने ई-बाईक भाड्याने घेतलेल्या प्रकल्पासाठी पुणे शहरात 250 वेगवेगळ्या ठिकाणी 1500 स्वॅपिंग पॉइंट्स असणार आहेत. आणखी 1000 ईव्ही चार्जिंग पॉइंट्स आणि 1500 स्वॅपिंग पॉइंट लवकरच उपलब्ध होणार आहेत. पुणे शहरात वाहतुकीचा प्रश्न हा ज्वलंत झाला असून शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. तसेच प्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणात होत असतो. शहरात जवळच्या ठिकाणी जात असताना अनेक पुणेकर नागरिक हे दुचाकींचा वापर करत असतात.

पुण्यात भाडेतत्त्वावर ई-बाईक सेवा सुरू करण्यात येणार : अशा वेळेस ई-बाईक ही वापरण्यात यावी, या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर ई-बाईक सेवा सुरू करण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेल वाहनांचा वापर कमी करण्यासाठी, हानिकारक वायू सोडणे आणि पर्यावरण प्रदूषित करणे पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पुणे शहरामध्ये वाढते प्रदुषण व वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी V-Tro Motors Pvt LTD या कंपनीच्या माध्यमातून ग्रीन पुणेसाठी "इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट" हि संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येत आहे.

पुणे महापालिक मुख्य रस्त्यांवर ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार : या इलेक्ट्रिक बाईक ने प्रवास करण्यासाठी महिन्याला 3800, तर आठवड्याला 1900, डेली 450,तासाला 100 रुपये खर्च येणार आहे.तर एक की.मी साठी 4 रुपये एवढं खर्च येणार आहे. ही बाईक वापरण्यासाठी सरासरी कमीतकमी ९० पैसे पासून ते जास्तीत जास्त ४ रु. किमी याप्रमाणे खर्च पुणेकरांना येणार आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी एका ठिकाणी १० बाईक चार्ज होतील, असे मुख्य रस्त्यावर एक चार्जंग स्टेशन अशा प्रकारचे पुणे शहराच्या विविध भागामध्ये मुख्य रस्त्यांवर ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.

दोन महिन्यांत हा उपक्रम सुरू होण्याची शक्यता : महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रथम टप्प्यात 250 ठिकाणी हा प्रकल्प दोन महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. व्रो मोटर्सने पूर्वी चालविलेल्या सायकल प्रकल्पाच्या पूर्ण नुकसान नियंत्रण / चोरीच्या समस्येचे विचार केले आहे. आयओटी सक्षम, फ्यूचरिस्टिक, मोबाइल आणि जीपीएस नियंत्रित बाइक आणि चार्जिंग स्टेशन विकसित करून चार्जिंग स्टेशन विकसित करून इच्छित सुरक्षिततेसाठी सर्व मानांकन.

पुणेकर हरित क्रांतीमध्ये रेकाॅर्ड करतील : आम्ही बाईकसह वेगवान चार्जर्सचे पॉइंट्स तयार करीत आहोत. आपल्या निवडीनुसार एक दिवसीय, मासिक आणि साप्ताहिक वापरासाठी अॅप सक्षम असेल. सुरुवातीला 250 चार्जिंग पॉईंट्स सुरू करणार आहे. तसेच 48 महिन्यांच्या आत भारतात भविष्यातील कमाल ईव्ही बाइक वापरून पुणेकर हरित क्रांतीमध्ये जादू तयार करतील.अस यावेळी विट्रोचे डॉ. हेरंब शेळके यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेकडून निविदा जाहीर : हा प्रकल्प संपूर्ण भारतातील पहिली महानगरपालिका पुणे महानगरपालिका आहे, जो हा प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पाद्वारे पुणे महानगरपालिकेने निविदा काढून सदर प्रकल्प दिले आहेत. या प्रकल्पाद्वारे ठेकेदारांनी स्वतःच्या जागेमध्ये चार्जिंग स्टेशन आणि स्वतः मेहकर उपलब्ध करून द्यायचे आहेत. तसेच या वेहिकल्स ची संपूर्ण सुरक्षितता आणि सर्व जबाबदारी ही ठेकेदारांची असणार आहे .यामध्ये 25 किलोमीटर पेक्षा कमी वेगाची बाईक वापरायला लायसनची आवश्यकता भासणार नाही मात्र त्याच्या पुढील वेगाशी त्याच्या पुढील 60 किलोमीटरच्या वेगाची बाईक वापरण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रांची गरज लागणार आहे. ई बाईक वापरण्यासाठी सरासरी कमीतकमी ९० पैसे पासून ते जास्तीत जास्त ४ रु. किमी याप्रमाणे खर्च पुणेकरांना येणार आहे.

Last Updated : Sep 22, 2022, 11:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.