ETV Bharat / business

DA Hike by Center : सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राकडून मिळू शकतं दिवाळी गिफ्ट? - 42 टक्के महागाई भत्ता

DA Hike by Center : आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय होऊ शकतो. केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करून सरकारी कर्मचाऱ्यांना दसरा आणि दिवाळीपुर्वी मोठ गिफ्ट दोऊ शकतं, अशी चर्चा आहे.

DA Hike
DA Hike
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 11:28 AM IST

Updated : Oct 15, 2023, 6:03 AM IST

नवी दिल्ली DA Hike by Center : नवरात्री सणापुर्वीची मंत्रिमंडळ बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

आजच्या मंत्रीमंदळ बैठकीत निर्णय होणे अपेक्षित : सणासुदीच्या आधी कोट्यवधी सरकारी कर्मचारी पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार केंद्र बुधवारी महागाई भत्त्यात (DA) वाढीची घोषणा करू शकते. ती जाहीर झाल्यास केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवरात्रपूर्व भेट ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि आर्थिक व्यवहार समितीची आज बैठक होत आहे. या बैठकीत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करेल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगानं पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळं महागाई भत्त्यात वाढ करणं हा केंद्राचा हा महत्त्वाचा निर्णय असणार आहे.

डीएचा फायदा काय : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत. 1 जुलैपासून लागू होणारा महागाई भत्ता केंद्र 42 टक्क्यांवरून 45 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो. डीए वाढीनंतर ऑक्टोबरच्या पगारात जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील महागाई भत्ता आणि थकबाकी समाविष्ट करणं अपेक्षित आहे. 15 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला दसरा आहे. त्यामुळं केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या या डीए वाढीमुळं 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. त्यांना वाढत्या महागाईच्या ओझ्यातून दिलासा मिळणार आहे.

किती टक्के वाढ अपेक्षित : डीए वाढवण्याचा फॉर्म्युला औद्योगिक कामगारांसाठी नवीनतम ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे. विशेष म्हणजे, डीए सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर डीआर हा पेन्शनधारकांना दिला जातो. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना डीए आणि डीआर वर्षातून जानेवारी आणि जुलै असा दोनदा वाढविला जातो. सध्या, एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42 टक्के महागाई भत्ता मिळतोय. मार्च 2023 मध्ये जेव्हा महागाई भत्ता वाढवण्यात आला तेव्हा तो 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के करण्यात आला. सध्याचा महागाईचा दर पाहता, यावेळी पुढील महागाई दरात 3 टक्के वाढ होणं अपेक्षित आहे.

हेही वाचा :

  1. Festive Season Sale 2023 : या फ्लॅटफॉर्म्सवर सुरू होतोय फेस्टिव्ह सिझन सेल, स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी!
  2. Today Petrol Diesel Rates: काय आहेत आज पेट्रोल डिझेलचे दर ? वाचा सोने चांदी, क्रिप्टोकरन्सी आणि भाजीपाल्याचे दर
  3. Israel Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यत

Last Updated : Oct 15, 2023, 6:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.