नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की नवीन संधी, व्यवसायाचे स्वरुप आणि रोजगार निर्मितीची क्षमता लक्षात घेऊन 5 जी लॅब सुरू करण्यात येणार आहेत. भारतात ऑक्टोबरमध्ये 5 जी सेवेला सुरुवात झाली. त्यानंतर रिलायन्स, जिओ आणि भारती एअरटेल कंपनीने शेकडो शहरात प्रत्यक्ष 5 जी सेवेला सुरुवात झाली आहे.
स्मार्ट क्लासरुम, शेतीविषयीचा अंदाज, वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य ॲपसाठी 5 जी लॅबचा वापर करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. 5 जी पुर्णपणे सुरू झाल्यानंतर नवीन आर्थिक संधी उपलब्ध होणार विकासातील जुने अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. नवसंशोधन, उद्योग आणि डिजीटल इंडियात अद्ययावत बदल होण्यास मदत होईल, असे आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2022-23 मध्ये म्हटले आहे.
नवीन संधी सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल कमी वेळेत वेगवान पद्धतीने 5 जीचा थेट ग्राहकांवर परिणाम होईल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. त्याचा स्टार्ट अप शिक्षण, आरोग्य, कामगार सुरक्षा आणि आधुनिक कृषी आणि इतर कामांसाठी वापर करण्यात येणार आहे. डिजीटायलेशनच्या वेगवान लाटेत स्मार्टफोनचा वापर वाढत आहे. तंत्रज्ञानाची नवीन दारे खुली होत असल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. सीएमआरचे इंडस्ट्री इंटिलिजिन्स ग्रुपचे प्रमुख प्रभू राम म्हणाले, की देशात 5 जीच्या 100 लॅब सुरू करणे हे 5 जीच्या नवीन संधी सुरू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
5जीसाठी दूरसंचार कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा रिलायन्स जिओने जगातील सर्वात वेगवान 5जी रोल आउट योजना तयार केली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरांसह अनेक प्रमुख शहरांमध्ये जिओ 5 लाँच करण्यात आले. डिसेंबर 2023 पर्यंत, भारतातील प्रत्येक शहर, तालुका आणि तहसीलमध्ये जिओ 5 जी पोहोचवू, अशी माहिती जिओचे मुकेश अंबानी यांनी दिली आहे. एअरटेल जिओत स्पर्धा जिओने प्रवेश केल्यानंतर भारतीय दूरसंचार उद्योग खूप बदलला आहे. केवळ 4जी नेटवर्क असूनही कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. आता 5जी युग आहे. जिओला एअरटेलशी स्पर्धा करावी लागणार आहे.
प्रत्येक शहरात सेवा 5 जी सेवा रिलायन्स जिओ देशातील प्रत्येक शहरात सेवा 5 जी सेवा देणार आहे. देशातील सगळ्यात स्वस्त 5जी इंटरनेट सेवा रिलायन्स जिओ देणार असल्याचे यापूर्वीच रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओसोबत 100 मिलियन घरांना जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. मेड इन इंडिया 5G इंटरनेट सेवेसाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को सारख्या दिग्गज टेक कंपन्यांसोबत भागिदारी केली असल्याचे मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमात सांगितले.