नवी दिल्ली: अॅपल Apple, गुगल Google, अॅमेझॉन Amazon, नेटफ्लिक्स Netflix आणि मायक्रोसॉफ्टच्या Microsoft भारतीय शाखांमधील उच्च अधिकारी मंगळवारी स्पर्धाविरोधी पद्धतींची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीसमोर हजर Tech companies summoned होतील. जयंत सिन्हा या संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. संसदेची वित्तविषयक स्थायी समिती बाजारातील स्पर्धेच्या विविध पैलूंवर विचार करत आहे. ही समिती विशेषत: मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांकडे लक्ष देत आहे.
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, बैठकीचा अजेंडा आहे - 'मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या स्पर्धाविरोधी पद्धतींबद्दल मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रतिनिधींचे तोंडी विधान'. सिन्हा म्हणाले की, Apple, Microsoft, Amazon, Google, Netflix आणि इतर काही भारतीय शाखांचे प्रतिनिधी डिजिटल बाजारातील स्पर्धात्मक वर्तनाच्या मुद्द्यावर संसदीय समितीसमोर हजर होतील.
भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री म्हणाले की समितीने आधीच भारतीय स्पर्धा आयोग CCI, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांशी या विषयावर चर्चा केली आहे. समितीने यापूर्वी स्विगी, झोमॅटो, फ्लिपकार्ट, ओला, ओयो आणि ऑल इंडिया गेमिंग असोसिएशनच्या All India Gaming Association प्रतिनिधींना बोलावले होते.
हेही वाचा - Adani Power shares अदानी पॉवरचे शेअर्स 5 टक्क्यांनी वधारले