सॅन फ्रान्सिस्को : न्यू वर्ल्ड आणि लॉस्ट आर्क ऑफ लाइफ सारखे लोकप्रिय गेम आणणारे अॅमेझॉन गेम्सचे स्टुडिओ प्रमुख माईक फ्राझिनी (Mike Frazzini resigns) यांनी राजीनामा दिला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, त्याच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अॅमेझॉन स्टुडिओमधून राजीनामा देत आहे. माईक सुरुवातीपासून अॅमेझॉन गेम्सच्या टीमशी संबंधित होता, असे अॅमेझॉनने निवेदनात म्हटले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली अॅमेझॉन गेम्सने एवढी उंची गाठली आहे. कंपनीने माईकच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माईकने 2004 मध्ये अॅमेझॉनच्या पुस्तक विभागातून कंपनीत आपल्या करिअरची सुरुवात केली. Amazon त्याच्या गेमिंग विभागाच्या ऑपरेशनवर दरवर्षी सुमारे $500 दशलक्ष खर्च करते.
हेही वाचा - Petrol, Diesel Prices : पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ सुुरुच, सहा दिवसात वाढले सुमारे पावणे चार रुपये