नवी दिल्ली: अंबुजा सिमेंट ( Ambuja Cements ) आणि ACC चे USD 6.5 बिलियन मध्ये अधिग्रहण पूर्ण केल्यानंतर, अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी म्हणाले की त्यांच्या समूहाची सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करण्याची आणि देशातील सर्वात फायदेशीर उत्पादक बनण्याची योजना आहे. ते म्हणाले की, जोमदार आर्थिक वाढ आणि पायाभूत सुविधांना सरकारच्या प्रोत्साहनामुळे भारतातील सिमेंटची मागणी अनेक पटींनी वाढेल.
त्यामुळे मार्जिनमध्येही लक्षणीय वाढ होणार आहे. अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष ( Adani Group Founder Gautam Adani ) यांनी 17 सप्टेंबर रोजी अधिग्रहण पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सांगितले की, त्यांचा समूह एकाच वेळी देशातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. अदानी समूहाने गेल्या आठवड्यात या दोन कंपन्यांमधील होल्सीमच्या स्टेकचे अधिग्रहण पूर्ण केले. हा करार चार महिन्यांत पूर्ण झाला.
"या व्यवसायात आमचा प्रवेश अशा वेळी झाला आहे जेव्हा भारत आधुनिक जगातील सर्वात मोठ्या आर्थिक विकासासाठी सज्ज आहे," ते त्यांच्या भाषणात म्हणाले. सिमेंट क्षेत्रात येण्याचे कारण सांगताना अदानी म्हणाले की, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक देश आहे, परंतु त्याचा दरडोई वापर चीनच्या 1,600 किलोच्या तुलनेत केवळ 250 किलो आहे. ते म्हणाले की, भारतात सिमेंटच्या वापरात मोठी वाढ अपेक्षित आहे.
हेही वाचा - Today Share Market Update : बाजार स्थिर होईपर्यंत आक्रमकपणे शेअर्सचे खरेदी-विक्री व्यवहार करणे टाळावे