सॅन फ्रान्सिस्को : 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदी होणार असल्याने, बहुतेक व्यावसायिक अर्थतज्ञांचा अंदाज आहे की काही कंपन्या येत्या काही महिन्यांत वेतन कमी करतील. एका नवीन सर्वेक्षणाचा हवाला देत एका अहवालानुसार, केवळ 12 टक्के अर्थशास्त्रज्ञांना त्यांच्या कंपन्या पुढील तीन महिन्यांत रोजगार वाढवतील अशी अपेक्षा आहे. नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिक्सने हे सर्वेक्षण केले आहे.
नोकऱ्या कमी झाल्याचा अंदाज : कोविड महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ही पहिलीच वेळ आहे की, अधिक व्यावसायिकांनी त्यांच्या कंपन्यांमधील नोकऱ्या कमी झाल्याचा अंदाज लावला आहे. NABE अध्यक्ष ज्युलिया कोरोनाडो यांच्या मते, निष्कर्ष यावर्षी मंदीमध्ये प्रवेश करण्याबद्दल व्यापक चिंता दर्शवतात. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या मोठ्या टेक कंपन्या सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीच्या हंगामात सामील झाल्यामुळे भारतासह जगभरात जानेवारीमध्ये सरासरी दररोज सुमारे 3,000 टेक कामगारांना कामावरून कमी केले जात आहे.
कर्मचारी काढून टाकण्याची योजना : सर्वेक्षणानुसार, निम्म्याहून अधिक व्यावसायिक अर्थतज्ज्ञांना पुढीलवर्षी मंदीचा धोका 50 टक्के किंवा त्याहून अधिक आहे. याचाच अर्थ असा की 2023 मध्ये अधिक टाळेबंदी होणार आहे. 166 टेक कंपन्यांनी आतापर्यंत 65,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने 12,000 कर्मचारी किंवा सुमारे 6 टक्के कर्मचारी काढून टाकण्याची योजना जाहीर केली. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, कंपनी असे बदल करेल ज्यामुळे आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी आमच्या एकूण कर्मचार्यांमध्ये 10,000 नोकऱ्या कमी होतील.
स्पॉटीफायची घोषणा : अॅमेझाॅनने यापूर्वी जागतिक स्तरावर 18,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यात भारतातील सुमारे 1,000 कर्मचारी होते. म्यूझिक स्ट्रीमिंग दिग्गज स्पॉटीफायने सोमवारी जागतिक स्तरावर 6 टक्के कर्मचारी किंवा सुमारे 600 कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली. layoffs.fyi.com या ट्रॅकिंग साइटवरील डेटानुसार, 2022 मध्ये, 1,000 हून अधिक कंपन्यांनी 154,336 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले.
मायक्रोसॉफ्टने केली कपातीची घोषणा : गुगलने कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची घोषणा केल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. मात्र याअगोदर मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या कर्मचार्यांपैकी 5 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अमेझॉननेही 18 हजार कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. फेसबुकने मेटाच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा : चॅट जीपीटी अन् गुगलमधील काय आहे फरक, चॅट बॉट गुगलची प्रासंगिकता संपवू शकतो का?