ETV Bharat / business

पतमानांकनात सुधारणेचा येस बँकेला फायदा; शेअरच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ

ब्रिकवर्क या पतमानांकन संस्थेने येस बँकेचे मानांकन 'बेसल ०२' वरून 'बेसल बीबी प्ल' अथवा 'स्थिर' केले आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअरची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे.

येस बँक
येस बँक
author img

By

Published : Dec 9, 2020, 5:58 PM IST

नवी दिल्ली - आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेचे शेअर सर्वाधिक १० टक्क्यांनी वाढले आहेत. ब्रिकवर्क या पतमानांकन संस्थेने येस बँकेच्या मानांकनात सुधारणा केली आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे.

ब्रिकवर्क या पतमानांकन संस्थेने येस बँकेचे मानांकन 'बेसल ०२' वरून 'बेसल बीबी प्ल' अथवा 'स्थिर' केले आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअरची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. मुंबई शेअर बाजारातयेस बँकेचे शेअर ९.९८ टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किट १९.०६ रुपयावर पोहोचले.

हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराचा नवा ऐतिहासिक उच्चांक; ४९५ अंशाने वधारून ओलांडला ४६,००० चा टप्पा

येस बँकेच्या भांडवलात सुधारणा झाली आहे. त्यामुळे येस बँकेच्या मानांकनात सुधारणा झाल्याचे ब्रिकवर्कने म्हटले आहे. ही माहिती येस बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. असे असले तरी येस बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता ही कमकुवत आहे.

हेही वाचा-हेरिजकडून फ्युचर रिटेलमधील ३ टक्के हिश्श्याची विक्री; मिळाले १३२ कोटी रुपये

दरम्यान, येस बँकेवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक यांनी यापूर्वी गुंतवणूक केली आहे. येस बँक घोटाळ्याप्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे(डीएचएफएल) प्रमुख कपिल वाधवान व धीरज वाधवान हे अटकेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.