नवी दिल्ली - जागतिक सोने परिषदेने (डब्ल्यूजीसी) देशात सोन्याच्या दागिन्यांची किरकोळ विक्री करण्यासाठी भरपूर संधी असल्याचे म्हटले आहे. देशातील ३७ टक्के महिलांनी कधीच सोने खरेदी केली नाही. पण त्यांना भविष्यात सोने खरेदी करण्याची इच्छा असल्याचे डब्ल्यूसीजीने म्हटले आहे. महिलांचा सोने खरेदीकडे का असतो कल, याविषयीही परिषदेने सर्व्हेक्षण केले आहे.
जागतिक सोने परिषदेने भारतामधील किरकोळ दागिने विक्रीवर सर्व्हेक्षण करून अहवाल तयार केला आहे. देशातील ६० टक्के महिलांकडे जुने सोन्याचे दागिने असल्याचे अहवालात म्हटले आहे. फॅशन आणि लाईफस्टाईलमध्ये सोन्याचे दागिने हा महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय प्रकार असल्याचे परिषदेने म्हटले आहे.
हेही वाचा-ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नव्हे 'जाळे'; टाळेबंदीतही ग्राहकांची होतेय फसवणूक
शहरामधील महिला सोन्याने येणाऱ्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करतात. सोन्यामुळे संपत्ती दाखविता येते, यामुळे महिलांचा सोन्याकडे कल आहे. तर ग्रामीण भागातील महिलांना सोन्यामुळे आदर आणि महत्त्वाकांक्षेचे गुण वाढतात, असे वाटते. अनेक तरुण महिला सोन्याच्या ग्राहक आहेत. १८ ते २४ वयोगटातील ३३ टक्के महिलांनी गेल्या १२ महिन्यात सोने खरेदी केल्याचे सर्व्हेक्षणात म्हटले आहे.
हेही वाचा-दिलासादायक! ट्रॅक्टर तयार करणाऱ्या 'या' कंपनीकडून व्हेटिंलेटर विकसित