नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेबरोबर घाऊक बाजारपेठेतील महागाई डिसेंबरमध्ये भडकल्याचे दिसून आले आहे. डिसेंबरमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाईची२.५९ टक्के नोंद झाली आहे. तर नोव्हेंबरमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाई ही ०.५८ टक्के होती.
डिसेंबर २०१८ मध्ये घाऊक बाजारपेठेत ३.४६ टक्के महागाईची नोंद झाली होती. डिसेंबर २०१९ मध्ये अन्नाच्या वर्गवारीत १३.१२ टक्के महागाईची वाढ झाली आहे. तर नोव्हेंबरमध्ये अन्नाच्या वर्गवारीत ११ टक्के महागाई वाढली होती. तर बिगर अन्नाच्या वर्गवारीत डिसेंबरमध्ये ७.७२ टक्के महागाईची नोंद झाली आहे. तर बिगर अन्नाच्या वर्गवारीत डिसेंबरमध्ये १.९३ टक्के महागाईची नोंद झाली होती. ही आकडेवारी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि उद्योगाने जाहीर केली आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करा, वाणिज्य मंत्रालयाचा प्रस्ताव
पालेभाज्यांच्या किमतीने महागाईत पडली भर-
पालेभांज्याच्या किमती डिसेंबरमध्ये ६९.६९ टक्क्यांनी वाढल्या होत्या. कांद्याच्या किमती ४५५.८३ टक्क्यांनी वाढल्या होत्या. तर बटाट्याच्या किमती ४४.९७ टक्क्यांनी वाढल्या होत्या. ग्राहक किंमत आधारित निर्देशांकावरील किरकोळ महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. किरकोळ बाजारपेठेतील महागाईने गेल्या पाच वर्षातील डिसेंबरमध्ये उच्चांक केला आहे. या महागाईची डिसेंबरमध्ये ७.३५ टक्क्यांची नोंद झाली आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराचा विक्रमी निर्देशांक; गाठला ४१,९०० चा टप्पा