नवी दिल्ली - व्होडाफोन-आयडियाचे शेअर आज २३ टक्क्यांनी वधारले आहेत. व्होडाफोनने देशातील व्यवसाय सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर गेली काही दिवस शेअर बाजारात घसरलेले व्होडाफोन-आयडियाचे शेअर सावरले आहेत.
मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन-आयडियाचे शेअर २२.८७ टक्क्यांनी वधारले आहेत, तर निफ्टीत २३.०७ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. व्होडाफोन भारतामधून गाशा गुंडाळणार असल्याची दूरसंचार क्षेत्रात चर्चा सुरू होती. याबाबत मुंबई शेअर बाजाराने कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते.
हेही वाचा-पीएमसीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयसह केंद्र सरकारकडून मागितले उत्तर
ब्रिटनची बलाढ्य दूरसंचार कंपनी असलेल्या व्होडाफोनने भारताच्या बाजारपेठेत गुंतवणूक सुरूच ठेवणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. सध्याच्या बदलल्या परिस्थितीमध्ये सरकारने सहकार्य करावे, अशी मागणीही कंपनीने केली.
भारतीय माध्यमात व्होडाफोनबाबत निराधार पसरल्या जात असल्याची कंपनीला जाणीव आहे. ती अफवा आणि द्वेषपूर्ण कृत्य असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान गेली काही दिवस जिओ कंपनीचा व्होडाफोन-आयडिसासह एअरटेलबरोबर वाद सुरू आहे.