ETV Bharat / business

खनिज तेलाच्या दराला 'टाळेबंदी'; प्रति बॅरल केवळ १५ डॉलरचा दर !

author img

By

Published : Apr 20, 2020, 11:58 AM IST

विश्लेषकांच्या मते खनिज तेलाची मागणी कमी झाल्याच्या प्रमाणात खनिज तेलाचे उत्पादन कमी झालेले नाही. त्यामुळे खनिज तेलाच्या दरातील घसरण सुरुच आहे.

खनिज तेल
खनिज तेल

सिंगापूर - जगभरातील देश कोरोनाच्या संकटाने टाळेबंदीत असल्याने खनिज तेलाच्या मागणीत प्रचंड घसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या खनिज तेलाची किंमत प्रति बॅरल १५ डॉलरहून कमी झाली आहे. हा गेल्या २० वर्षांमधील सर्वात कमी दर आहे.

अमेरिकेच्या खनिज तेल किमतीचा निर्देशांक (वेस्ट टेक्सास इंटरमिडियट) हा १९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल हा १४.७३ डॉलर झाला आहे. यापूर्वी हे दर प्रति बॅरल १५.७८ डॉलर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर ४.१ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल २६.९३ डॉलर झाले आहेत. यापूर्वी प्रति बॅरलचा दर हा २८.११ डॉलर होता.

हेही वाचा-टाळेबंदीत अक्षय तृतीया : सोने खरेदीकरिता 'या' ज्वेलर्सने दिला ऑनलाईन पर्याय

सौदी अरेबिया, ओपेक राष्ट्रसमूह आणि रशियांमधील तेल किमतीवरून सुरू झालेल्या स्पर्धेमुळे खनिज तेलाचे दर आणखी घसरले होते. या वादावर एप्रिल महिन्याच्याअगोदर तोडगा काढण्यात आला आहे. विश्लेषकांच्या मते खनिज तेलाची मागणी कमी झाल्याच्या प्रमाणात खनिज तेलाचे उत्पादन कमी झालेले नाही. त्यामुळे खनिज तेलाच्या दरातील घसरण सुरुच आहे.

हेही वाचा-शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ४०० अंशांनी वधारला: 'या' कंपन्यांचे वधारले शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.