ETV Bharat / business

डिझेलपाठोपाठ दिल्लीत टोमॅटो महाग ; प्रति किलो 50 ते 100 रुपये! - Tomato prices in Delhi

पावसामुळे टोमॅटो पिकाचे झालेले नुकसान, तापमानात झालेली वाढ आणि पेट्रोलसह डिझेलचे वाढलेले दर या कारणांनी टोमॅटोच्या किमती दिल्लीच्या बाजारपेठेत वाढल्या आहेत.

संग्रहित - टोमॅटो
संग्रहित - टोमॅटो
author img

By

Published : Jul 20, 2020, 8:18 PM IST

नवी दिल्ली – टोमॅटोच्या किमती आवाक्याबाहेर वाढत असल्याने सर्वसामान्य दिल्लीकर त्रस्त झाले आहेत. डिझेल सतत महागल्याने वाहतुकीचा खर्च वाढल्याने भाजीपाल्यांचे विशेषत: टोमॅटोचे दर वाढले आहेत.

पावसामुळे टोमॅटो पिकाचे झालेले नुकसान, तापमानात झालेली वाढ आणि पेट्रोलसह डिझेलचे वाढलेले दर या कारणांनी टोमॅटोच्या किमती दिल्लीच्या बाजारपेठेत वाढल्या आहेत. ईटीव्ही भारतच्या टीमने दक्षिण दिल्लीमधील भाजीमंडईत जावून दरवाढीची स्थिती जाणून घेतली. यावेळी विक्रेत्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने टोमॅटोचे दर दुप्पट झाल्याचे सांगितले. दर वाढल्याने ग्राहकांकडून टोमॅटोची खरेदी कमी होत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

तापमान वाढत असताना शिल्लक राहिलेले टोमॅटो खराब होत आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे, अशा परिस्थितीला सामोरे जात असल्याचे या विक्रेत्याने सांगितले. दिल्लीत टोमॅटोचा किरकोळ विक्रीतील दर आज (सोमवारी) 50 ते 100 रुपये प्रति किलो राहिला आहे. सामान्यत; टोमॅटोचा दर किरकोळ बाजारपेठेत प्रति किलो 20 ते 30 रुपये असतो. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून टोमॅटोचे दर सातत्याने वाढत आहेत.

राजधानीत डिझेल भाववाढीचा उच्चांक

मागणी कमी असतानाही अचानकपणे डिझेलचे दर आज नवी दिल्लीत वाढले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर 12 पैशांनी आज वाढले आहेत. तर डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. नवी दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 81.64 रुपये आहे. तर रविवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर 81.52 रुपये होता. डिझेलच्या किमती पेट्रोलहून अधिक असलेले दिल्ली हे देशातील एकमेव महानगर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.