ETV Bharat / business

लाल चिखल! टोमॅटोचे दिल्लीसह प्रमुख महानगरात कोसळले दर - tomato rate today

राजधानीमधील आझादपूर येथे घाऊक बाजारपेठेत टोमॅटोचा भाव प्रति किलो १४.३० रुपये आहे. तर हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये टोमॅटोचा भाव प्रति किलो ३० रुपयांहून अधिक आहे. कोरोनाच्या संकटात मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक झाली आहे.

टोमॅटो
टोमॅटो
author img

By

Published : May 22, 2020, 5:10 PM IST

नवी दिल्ली - टोमॅटोच्या किमती दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये घसरल्या आहेत. या शहरामधील विविध भाजीमंडईत टोमॅटोचे दर प्रति किलो ४ ते १० रुपयापर्यंत शुक्रवारी घसरले आहेत. हा गेल्या तीन वर्षातील टोमॅटोला मिळालेला नीचांकी भाव आहे.

गतवर्षी राजधानीमधील आझादपूर येथे घाऊक बाजारपेठेत टोमॅटोचा भाव प्रति किलो १४.३० रुपये आहे. तर हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये टोमॅटोचा भाव प्रति किलो ३० रुपयांहून अधिक होता. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटात मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक झाली आहे. त्यामुळे नाशवंत असलेल्या टोमॅटोचे दर घसरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा-आरबीआयकडून दिलासा; कर्जदारांना पैसे भरण्याकरता आणखी तीन महिन्यांची मुदत

दिल्लीमध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून टोमॅटोची आवक होते. हैदराबामधील बौवेनपल्ली येथील घाऊक बाजारपेठेत टोमॅटोची किंमत शुक्रवारी प्रति किलो ५ रुपये होती. तर गेल्यावर्षी मे महिन्यात टोमॅटोला प्रति किलो ३४ रुपये भाव होता. बंगळुरूच्या घाऊक बाजारपेठेत टोमॅटोची किंमत प्रति किलो १० रुपयापर्यंत घसरली आहे.

हेही वाचा-जाणून घ्या, आरबीआयचे गव्हर्नर दास यांच्या पत्रकार परिषदेमधील ठळक मुद्दे

टोमॅटो उत्पादक असलेल्या भागातील घाऊक बाजारपेठेतही टोमॅटोचे भाव घसरले आहेत. देशामध्ये टोमॅटोचे पुरेसे उत्पादन होते. दरवर्षी देशामध्ये १११ लाख टन टोमॅटोची मागणी असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.